दि इंटरनॅशनल चिल्ड्रेन्स पेटींग कॉम्पिटीशन 2018
इन मेमरी ऑफ क्लिंट
Picture of Edmund Thomas Clint

नियम आणि अटी


 1. ही ऑनलाईन चित्रकला स्पर्धा जगभरातील सर्व देशांच्या मुलांसाठी मुक्त आहे. ही स्पर्धा चार ते सोळा वर्षे वयाच्या (01.09.2002 रोजी/नंतर आणि 01.09.2014 रोजी/त्यापूर्वी जन्मलेल्या) मुलांसाठी असल्यामुळे, त्यांचे आई-वडील किंवा कायदेशीर पालक यांनी इथे थेट प्रकाशित इंग्लिशमधील किंवा आपल्या पसंतीच्या भाषा अनुवादकाद्वारे या स्पर्धेच्या नियम आणि अटी वाचणे, समजून घेणे आणि स्विकारणे अपेक्षित आहे.
 2. या स्पर्धेला भारतीय प्रजासत्ताकाचे सर्व कायदे लागू होतील.
 3. हे आवेदन सादर करुन, सहभागी आणि त्याचे/तिचे आई-वडील किंवा कायदेशीर पालक या स्पर्धेच्या सर्व नियम आणि अटी स्विकारत आहेत.
 4. केरळ टुरिझमने ही स्पर्धा कोणतेही विशिष्ट कारण न देता अंशतः किंवा पूर्णतः रद्द करणे किंवा स्पर्धेचे नियम आणि अटी अंशतः किंवा पूर्णपणे बदलणे याचा अधिकार राखून ठेवला आहे.
 5. सचिव, पर्यटन विभाग, केरळ सरकार या स्पर्धेतून उद्भवणाऱ्या किंवा त्याच्याशी निगडीत कोणत्याही तंट्यावर निर्णय देणे किंवा तो सोडवणे यासाठी अंतिम अधिकारी राहतील आणि या सचिवांचा निर्णय अशा सर्व प्रकरणी अंतिम आणि दाद-अयोग्य राहील.
 6. या स्पर्धेसाठीच्या सहभागीने केरळबद्दल कोणत्याही पैलूवर एक चित्र कागदावर रंगवायचे आहे. केरळवर उपलब्ध छायाचित्रं आणि विडीयोज काही असल्यास त्याचा संदर्भ तो/ती घेऊ शकतो. चित्राची एक स्कॅन केलेली प्रतिमा ऑनलाईन सादरीकरण पद्धत वापरुन केरळ टुरिझमकडे पाठवायची आहे. केरळ टुरिझमने मागणी केल्यास, सहभागीने मूळ चित्र देखील स्वतःच्या खर्चाने पाठवले पाहिजे.
 7. स्पर्धेमध्ये प्राप्त प्रवेशिका आपली जाहिरात किंवा प्रचार कार्यांसाठी वापरण्याचा गैर-सर्वस्वी हक्क केरळ टुरिझमने राखून ठेवला आहे.
 8. या स्पर्धेच्या संदर्भातील सर्व पत्र व्यवहार केवळ इंग्लिश भाषेतून करण्यात येईल.

तपशीलवार नियम आणि अटी पाहा

प्रचार वेळापत्रक


 1. या स्पर्धेसाठी नोंदणी 1 सप्टेंबर, 2018 रोजी सुरु होईल. नोंदणीची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर लगेच प्रवेशिका सादर करण्यास सुरुवात होईल.
 2. प्रवेशिका 31 जानेवारी 2019 पर्यंत सादर करता येतील
 3. सर्वोत्तम 2000 चित्रांची निवड एका समितीद्वारे करण्यात येईल आणि 31 मार्च 2019 रोजी प्रकाशित केली जाईल
 4. विजेत्यांची घोषणा 2 मे 2019 रोजी करण्यात येईल.