दि इंटरनॅशनल चिल्ड्रेन्स पेटींग कॉम्पिटीशन 2018
इन मेमरी ऑफ क्लिंट
Picture of Edmund Thomas Clint

सहभाग कसा घ्यावा


 1. जगाच्या कोणत्याही भागातील मुले (01.09.2002 रोजी/नंतर आणि 01.09.2014 रोजी/पूर्वी जन्मलेली) या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.
 2. या चित्रकला स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क नाही.
 3. ही स्पर्धा मुलांसाठी असल्याने (4-16 वर्षे), आई-वडील किंवा पालकांना त्यांच्या वतीने नोंदणी नमुना सादर करावा.
 4. नोंदणी केल्यानंतर, संबंधित व्यक्तिला पडताळणीसाठी एक ईमेल पाठवला जाईल.
 5. नोंदकर्त्याने वेरिफिकेशन कोडवर क्लिक केले, की नोंदणी पूर्ण होईल.
 6. या चित्रकला स्पर्धेची संकल्पना 'केरळ'. अशी आहे. सहभागी केरळच्या कोणत्याही पैलूवर चित्र काढू शकतो.
 7. हे चित्र हाताने ब्रश आणि रंग वापरुन कागदावर काढलेले असावे. सहभागी आपल्या पसंतीचे कोणतेही रंग साहित्य वापरु शकतो (वॉटर कलर, क्रेयॉन्स, इ.)
 8. एकदा चित्र पूर्ण झाले की, की पालक किंवा आईवडिलांनी केरळ टुरिझम वेबसाईटवर स्पर्धेसाठीच्या पानावर लॉगइन करावे आणि चित्राची स्कॅन केलेली ईमेज सादर करावी. चित्राच्या फाईलचा आकार 5MB पेक्षा अधिक नसावा.
 9. प्रवेशिका सादर करण्याचा अतिम दिनांक 31 जानेवारी 2019 आहे.
 10. सहभागी केवळ एकदाच नोंदणी करु शकतो परंतु त्याला/तिला वाटल्यास एकाहून अधिक प्रवेशिका, अधिकतम पाच, पाठवू शकतो. परंतु, एका सहभागीच्या सर्व प्रवेशिका एकाच लॉगइन आयडीखाली सादर केल्या पाहिजेत.
 11. कायदेशीर पालक किंवा आईवडील यांना एकाहून अधिक सहभागीसाठी नोंदणी करायची असेल तर, ती भिन्न ईमेल आयडींद्वारे नोंदवावी. दुसऱ्या शब्दांत, एका ईमेल आयडीवरुन केवळ एकच सहभागी नोंदणी करु शकेल.

लगेच नोंदणी करा