Trade Media
     

जबाबदार पर्यटन – केरळ अपडेट

  जबाबदार पर्यटन (आरटी) - केरळ पर्यटनाच्या नवीन आणि व्यापक कार्यक्रमातील पहिला टप्पा लक्षणीय कामगिरीसह पूर्ण झाला आहे. नमुना टप्पा म्हणून, हा कार्यक्रम चार ठिकाणी कार्यान्वित झाला आहे जसे  कोवलम, कुमरकम, टेक्कडी आणि वायनाड. या ठिकाणांपैकी कुमरकमला जबाबदार पर्यटनाचे यशस्वी मॉडेल म्हणून मान्यता मिळाली आहे आणि भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयातर्फे केरळमधील सर्वोत्तम जबाबदार पर्यटन कार्यक्रम म्हणून मान्यता मिळाली आहे.


केरळ सरकारच्या पर्यटन विभागाने इंटरनॅशनल सेन्टर फॉर रिस्पॉन्सिबल टूरिझम इंडिया (आयसीआरटी इंडिया) आणि EQUATIONS (इक्विटेबल टूरिझम ऑप्शन्स) यांच्या संयुक्त विद्यमाने, थिरुवनंतपुरम येथे 2 आणि 3 फेब्रुवारीला एका राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन केले होते.या दोन दिवसीय कार्यशाळेत अनेक भागधारकांनी सहभाग घेतला होता ज्यात सरकारी, स्थानिक-स्वराज्यसंस्था, पर्यटन उद्योग, नागरी संस्था, शिक्षणतज्ज्ञ, मिडिया आणि विधानसभा सदस्यांनीही सहभाग घेतला होता. कार्यशाळेच्या शेवटी एक राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात आली ती म्हणजे,  राज्यस्तरीय जबाबदार पर्यटन समिती (एसएलआरटीसी) ज्यात विविध क्षेत्रांतील प्रतिनिधींनी कार्यशाळेत चर्चेतून उत्पन्न झालेल्या मुद्द्यांना पुढे नेण्याचे आणि एक जबाबदार पर्यटन स्थान बनण्याच्या दृष्टीने पावले उचलायचे ठरवले.

राज्यस्तरीय जबाबदार पर्यटन समिती 20 एप्रिल 2007 ला भेटली व त्यातून जबाबदार पर्यटन कार्यक्रमाचे कार्यान्वयन टप्प्याटप्प्याने करायचे ठरले. कुमरकम, टेक्कडी आणि वायनाड आणि कोवलम यांना पहिल्या टप्प्यात जबाबदार पर्यटनाच्या कार्यान्वयनासाठी निवडले. सरकारने स्पर्धात्मक निविदांद्वारे ग्रेट इंडियन टूरिझम प्लानर्स एन्ड कन्सल्टन्ट्स (जीआयटीपीएसी) यांनाही तांत्रिक साहाय्य आणि निवडलेल्या केंद्रात समन्वय यासाठी निवडले. प्रत्यक्ष कार्यान्वयन प्रक्रिया मार्च, 2008 मध्ये सुरू झाली.

स्थळांवरील कार्यक्रमाचा थोडक्यात आढावा:

कुमरकम येथील जबाबदार पर्यटन कार्यक्रम
कुमरकम येथील जबाबदार पर्यटन कार्यक्रमाने मोठे यश मिळवले आणि जबाबदार पर्यटनाच्या कार्यान्वयनात ते एक मॉडेल ठरले. या खेरीज, या कार्यक्रमाने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवले.

जबाबदार पर्यटन कार्यान्वयनाची प्रक्रिया कुमरकम मध्ये सुरू झाली ती 16 मे 2007 मध्ये झालेल्या भागधारकांच्या कार्यशाळेने. कार्यशाळेचा उद्देश हा सर्व भागीदारांमध्ये जबाबदार पर्यटन स्वीकारण्याच्या दृष्टीने जागृती निर्माण करणे हा होता. या कार्यशाळेत अनेक प्रकारचे भागधारक सहभागी झाले ज्यात, लोकप्रतिनिधी,  सरकारी प्रतिनिधी, स्थानिक-स्वराज्यसंस्था, पर्यटन उद्योग, नागरी संस्था, शिक्षणतज्ज्ञ, मिडिया आणि विधानसभा सदस्य यांचा समावेश होता. कार्यशाळेत जबाबदार पर्यटनाच्या आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणविषयक पैलूंवर चर्चा करण्यात आली आणि या प्रत्येक क्षेत्रासाठी कार्यप्रणाली ठरवीण्यात आली. कार्यशाळेचे उद्घाटन विधानसभा सदस्य व्ही.एन. वासवान यांनी केले. याचे अध्यक्ष होते केरळ पर्यटनचे संचालक श्री, संजय कौल आय.ए.एस., कार्यशाळेचे नेतृत्व केले डॉ. वेणू व्ही. आय.ए.एस, सचिव (पर्यटन) आणि श्री. यू. व्ही. जोस, अतिरिक्त संचालक, पर्यटन.

पर्यटन विभागाने प्रत्यक्ष क्षेत्रातील जबाबदार पर्यटनासाठी कुडूम्बश्री सल्लागार नेमण्याचे ठरवले. पंचायत आणि कुडुम्बश्री सरकारने कुमरकम मध्ये आरटीच्या प्रभावी कार्यान्वयनासाठी काम सुरू केले. सल्लागाराने हॉटेल उद्योगात एक मागणी विश्लेषण सर्वेक्षण केले आणि हॉटेल्स आणि रेस्टॉरन्ट्सना भाज्यांचा पुरवठा अखंड व्हावा म्हणून एक शेतकी दिनदर्शिका तयार केली. पंचायतीने शेती क्षेत्राच्या सुधारणेसाठी आर्थिक जबाबदारीचे कार्यान्वयन करायचे ठरवले. प्रत्येक कुडुम्बश्री गटाने प्रत्येक भाजीच्या पिकासाठी एक अशा पाच सदस्यांचा एक कार्यगट करायचे ठरवले. अशा प्रकारे, कुमरकम मध्ये 180 गटांनी (900 स्त्रिया) भाज्यांची लागवड सुरू केली. पंचायतीने लागवडीसाठी जागा उत्पन्न करून दिली आणि रु. 1,50,00/ किंमतीची खते व बियाणे या गटांना पुरवली.

14 मार्च 2008 रोजी, श्री. कोडीयेरी बालकृष्णन, माननीय मंत्री, पर्यटन, गृह आणि सतर्कता यांनी कुमरकम येथील जबाबदार पर्यटन कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन केले. 18 मार्च 2008 ला 11 उत्पादनांच्या क्लस्टर अप्रोचच्या आधारावर हॉटेल व रेस्टॉरन्ट्सना स्थानिक भाज्यांचा पुरवठा होऊ लागला. 

आर्थिक जबाबदारीचा भाग म्हणून, पर्यटन मंत्रालयाने या ठिकाणी अनेक लघु उद्योग, स्मरणिका युनिट, कला आणि सांस्कृतिक गट यांचा विकास केला. यांपैकी, कुडुम्बश्रीद्वारा संचालित समृद्धी नावाचे स्थानिक पुरवठा युनिट आघाडीवर होते. आर्थिक जबाबदारी कार्यक्रमाने रु. 45,76,343  स्थानिकांनी एवढी मिळकत मिळवली (मार्च 2008 ते जून 2010).

कुमरकम मधील जबाबदार पर्यटन कार्यक्रमाची काही यशस्वी फलिते पुढीलप्रमाणे:
  • ओसाड जमीन लागवडीखाली आली आणि शेतीचे उत्पादन वाढले.
  • फिश फार्म आणि कमळांची लागवड
  • हॉटेल उद्योगाशी संपर्क वाढवून स्थानिक उत्पादनांची मागणी वाढवणे.
  • स्मृतिचिन्ह उद्योगाचा विकास
  • समाजाधारित पर्यटन उत्पादने
  • स्थानिक कलाप्रकार व संस्कृतीला प्रोत्साहन
  • सांस्कृतिक पर्यटन आणि पारंपारिक पदार्थांना प्रोत्साहन
  • सामाजिक जाणीव आणि पर्यटक व्यवस्थापन
  • पर्यावरण रक्षण
  • ऊर्जा बचतीचे उपाय
  • संसाधनांचे साकल्याने मापन
  • स्थानाची लेबर सूची.

वायनाड
जबाबदार पर्यटन कार्यान्वयनाची प्रक्रिया या जिल्ह्यात सुरू झाली ती 6 मे 2007 मध्ये झालेल्या भागधारकांच्या कार्यशाळेने. कार्यशाळेचा उद्देश हा सर्व भागीदारांमध्ये जबाबदार पर्यटन स्वीकारण्याच्या दृष्टीने जागृती निर्माण करणे हा होता. या कार्यशाळेत अनेक प्रकारचे भागधारक सहभागी झाले ज्यात, लोकप्रतिनिधी,  सरकारी प्रतिनिधी, स्थानिक-स्वराज्यसंस्था, पर्यटन उद्योग, नागरी संस्था, शिक्षणतज्ज्ञ, मिडिया आणि विधानसभा सदस्य यांचा समावेश होता. कार्यशाळेत जबाबदार पर्यटनाच्या आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणविषयक पैलूंवर चर्चा करण्यात आली आणि या प्रत्येक क्षेत्रासाठी कार्यप्रणाली ठरवीण्यात आली. कार्यशाळेचे उद्घाटन विधानसभा सदस्य श्री. के. सी. कुंजरामन यांनी केले. याचे अध्यक्ष होते जिल्हा पंचायतीच्या स्थायी समितीचे अध्यक्ष, कार्यशाळेचे नेतृत्व केले डॉ. वेणू व्ही. आय.ए.एस, सचिव (पर्यटन) आणि श्री. यू. व्ही. जोस, अतिरिक्त संचालक, पर्यटन.


वायनाडमध्ये, पर्यटन विभागाने जबाबदार पर्यटन कार्यक्रम जानेवारी 2008 मध्ये सुरू केला. या कार्यक्रमाचे लक्ष्य मुख्यतः तीन क्षेत्रे होती, आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणविषयक. कुडुम्बश्री गटांद्वारे, स्थानिक शेतकरी आणि कारागिरांद्वारे बनवलेली स्थानिक उत्पादने आर्थिक जबाबदारीचा एक भाग म्हणून हॉटेल उद्योगाला पुरवली गेली. समाज आणि उद्योग यांच्यातील दरी यामुळॆ कमी झाली आणि त्यांच्यातील संबंध सुधारले. या व्यतिरिक्त, त्यांना जबाबदार पर्यटन कार्यक्रमात सहभागाच्या दृष्टीने संबंध जोडण्याची संधी मिळाली. स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा कुडुम्बश्री कार्यक्रम, बिगर सरकारी संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यटन उद्योग यांनी एकत्र काम करून या ठिकाणाच्या आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणविषयक पैलूंना विकसित करण्याचे प्रयत्न केले.

नमुना प्रयोगासाठी जेव्हा या स्थळाची निवड झाली तेव्हा संपूर्ण जिल्ह्याची झाली होती. नंतर कार्यान्वयनाच्या क्षेत्राचा खूप विस्तार लक्षात घेऊन नमुना आर्थिक जबाबदारी काय केवळ वैतिरी भागात ज्यात वैतिरी, कलपेट्टा, पोझुताना आणि मेप्पडी पंचायत. येथे समृद्धी समूह स्थापन केलेला आहे आणि कुडुम्बश्रीही या कार्यान्वयनात सहभागी आहेत. उपलब्ध उत्पादनांच्या पुरवठ्याने चांगली सुरुवात झाली आहे आणि पुढील पर्यटन मौसमापर्यंत पुरवठा स्थिरावण्याची चिन्हे आहेत.   

या स्थळी समृद्धी समूहाने आपले कार्य बऱ्याच सुरुवातीपासून सुरू केले. सततच्या चर्चा व हॉटेलमालकांसह भेटी घेऊन, समृद्धीने उद्योग भागीदारांशी चांगले संबंध जुळवले. या स्थळी, शेतकरी समूह काढणे, उत्पादन युनिट जैविक शेतीला प्रोत्साहन देणे करण्यात आले. परिणामी, अनेक स्थानिक उत्पादक पुढे आले ज्यांना या कार्यान्वयन प्रक्रियेत रस होता. सुरुवातीला, दोन ठिकाणांना 12 उत्पादनांचा पुरवठा होत होता. नंतर ही संख्या 10 ठिकाणांना 43 उत्पादने एवढी वाढली. वायनाडमध्ये किंमत-निश्चिती आणि दर्जा समिती स्थापन करण्यात आली ज्यांनी खरेदी व विक्री व्यवस्थेचे लक्षणीय व्यवस्थापन करून त्यांची उपस्थिती दाखवून दिली.

    
पारंपारिक खाद्य केंद्रे
हा वायनाडमधील एक नमुना कार्यक्रम होता. आरटी विभागाने एडक्कल गुंफा आणि पुकोट लेकच्या परिसरात दोन पारंपारिक खाद्य केंद्रे सुरू केली. एडक्कल गुंफांच्या जवळचा हा स्टॉल वायनाडमधील आदिवासी समाजाद्वारे चालवला जातो तर पूकोट लेक जवळचा कुडुम्बश्रीद्वारे. एडक्कलचा स्टॉल जेथे आदिवासी, पारंपारिक आणि देशी पदार्थ मिळतात त्याने महिन्याभरातच रु. 1.25 लाखाची मिळकत प्राप्त केली.
 
आता, 20 कुडुम्बश्री युनिट्स, 20 शेतकरी आणि 10 हस्तकला कारागीर समृद्धी शॉपला उत्पादने पुरवतात. समृद्धीमधून मिळालेला एकूण महसूल मार्च 2009 ते मे 2010 मध्ये रु.7,22,460/- एवढा होता. यातील 80% पेक्षा जास्त रक्कम स्थानिक लोकांना दिली गेली. समृद्धीशी संबंधित 10 प्रमुख हॉटेल्स आणि रेसॉर्ट्स आहेत.    

कार्यान्वयन प्रक्रियेतील एक मुख्य भाग होता सामाजिक जबाबदारी. कार्यान्वयन अधिक नाविन्यपूर्ण बनविण्यासाठी, आरटी विभागाने तीर्थक्षेत्रे, उत्सव आणि जत्रांना अनुसरून एक उत्सव दिनदर्शिका तयार केली, पर्यटनाशी संबंधित मुख्य सामाजिक समस्या शोधून काढल्या आणि सुरक्षा समस्या, पारंपारिक आणि देशी खाद्य, सुविधांच्या उणीवांचे विश्लेषण, आचरण नियम ठरवणे, समाजाधारित पर्यटन उत्पादने शोधणे, वायनाड स्मृतिचिन्हांचा विकास, स्थळ सूची, संसाधनांचे मोजमाप, सामाजिक सर्वेक्षण, मुख्य स्थळ सर्वेक्षण आणि लेबर सूची अशा विषयांचा अभ्यास केला. या सर्च विषयांसाठी विभागाने तपशीलवार अहवाल आणि योजना बनवल्या आहेत. 

स्थान संसाधन सूची
वायनाडच्या आरटी विभागाने स्थान सूची तयार केली आहे ज्यात, वायनाड जिल्ह्यातील सर्व मुख्य घटक आणि संसाधने आहेत. आरटी विभागाद्वारे ही सूची तयार करण्यासाठी सखोल अभ्यास केला गेला. हा अभ्यास या ठिकाणी सर्वसमावेशक आणि मूळापर्यंत जाऊन मापन करण्याने झाला. या सूचीत नैसर्गिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, भौगोलिक आणि सामाजिक तपशीलांचा समावेश आहे.

उत्सव दिनदर्शिका
सांस्कृतिक पर्यटनाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आरटी विभागाने एक तपशीलवार उत्सव दिनदर्शिका बनवली आहे ज्यात वायनाडमधील प्रमुख तीर्थक्षेत्रांचा अंतर्भाव आहे. यात इतिहास, उत्सव, धार्मिक विधी, देवळातील कला इ. चा समावेश आहे. प्रत्येक समाजाच्या श्रद्धा आणि पूजनाबद्दल यातून माहिती मिळते.              

स्मृतिचिन्ह विभाग
स्मृतिचिन्हांमुळे स्थानिक कारागीर, हस्तकला कारागीर यांना प्रोत्साहन मिळते, ज्यामुळॆ त्या स्थानाला एक नवीन विशेष प्राप्त होतो. आरटी विभागाने तीन प्रकारची स्मृतिचिन्हे बनवली आहेत जसे मसाल्यांचा संच, एडक्कल गुंफांची कोरीव प्रतिमा, कॉफी स्टंप उत्पादने. आता ही सर्व उत्पादने समृद्धी शॉपद्वारे विकली जातात.          

एडक्कल गुंफांसाठी पर्यटक व्यवस्थापन योजना 
एडक्कल गुंफा – इतिहासपूर्वकालीन दगडी गुंफा हे वायनाडमधील मुख्य आकर्षण आहे. एडक्कलमधील पर्यटकांच्या व्यवस्थापनासाठी, आरटी विभागाने प्रभावी पर्यटक व्यवस्थापन योजना तयार केली आहे ज्यामुळे गर्दीचे हे ठिकाण पर्यटकांसाठी अधिक सोयीचे होईल.     

वायनाड येथील ग्रामीण जीवनाचा अनुभव
वायनाड येथील अजून अस्पृष्ट असे ग्रामीण जीवन अनुभवण्यासाठी आरटी विभागाकडून दोन पॅकेजेसची घोषणा केली गेली. यांची नावे दिली गेली – “रोड टू दि फ्रॅग्रन्ट हिल” आणि “जर्नी टू दि सोल ऑफ नेचर”. “रोड टू दि फ्रॅग्रन्ट हिल” चा विकास पोझुताना ग्रामपंचायत मधील सुगंधगिरीने केला आहे. यात स्थानिक उपलब्ध सामुग्री जसे बांबू, माती आणि थेरुआ गवत यांचा उपयोग करून पारंपारिक निवासस्थाने बनवली आहेत.  

जर्नी टू दि सोल ऑफ नेचर हे करिमकुट्टी, कोट्टतरा ग्रामपंचायत येथे आहे. या पॅकेजमध्ये पझसी राजांचे योद्धे कुरिचिया यांच्या राजेशाही संस्कृतीची ऒळख करून दिली जाते. येथील संयुक्त कुटुंबपद्धतीत, आपल्याला त्यांच्या जीवनशैलीतील वेगळेपणा, परंपरा, विधी आणि शेती आणि वैद्यकीय पद्धती यांची माहिती मिळते. या पॅकेजमधील आणखी एक आकर्षण आहे, रेशमाच्या किड्यांच्या उत्पादनाचे केंद्र. यात रेशीम उत्पादनाच्या विविध पायऱ्या, कॉफी, सुपारी, नारळ, आले, केळे, हळद, काळी मिरी, जायफळ इ. लागवड दाखवली आहे. अन्य मुख्य आकर्षण आहे, माशांचे तळे, जे पारंपारिक मासेमारीचा अनुभव देते.   

या पॅकेजिसद्वारे, पर्यटकांना स्थानिक शेतकरी, मुले, पारंपारिक वैद्य यांना भेटण्याची संधी मिळते. ही अनोखी पॅकेजिस येथील गावांच्या सुंदर वातावरणाचा वेगळा अनुभव देतात आणि स्थानिक लोकांनाही पर्यटनाचा लाभ मिळतो.  

याखेरीज, आरटी विभागाने तपशीलवार सर्वेक्षणे केली जसे सामाजिक सर्वेक्षण आणि कोअर डेस्टिनेशन सर्वे, ज्यातून स्थानिक लोक आणि उद्योगाची पर्यटनाप्रति जाणीव दृढ झाली. तसेच यातून स्थानिक समाजाची स्थितीही कळून येते. विभागाद्वारे सुरक्षा समस्या, आचरणाचे नियम, माहितीपत्रके, सामाजिक समस्यांचे लेखापरीक्षण इ. अभासही केले गेले.
         

पर्यावरणाप्रति जबाबदारी
अन्य मुख्य जबाबदारी क्षेत्रांप्रमाणेच, वायनाड मध्ये आरटी विभागाने पर्यावरण जबाबदारी कार्यही सशक्त केले आहे. विभागाने केलेल्या सर्वेक्षणांमध्ये क्लीन सूचिप्पारा कार्यक्रम, पूकोट लेक येथे प्लास्टिक प्रदूषण नियंत्रण, पर्यावरण सर्वेक्षण, स्ट्रीट लाईट सर्वे आणि पवित्र उपवन अध्ययन.     

क्लीन सूचिप्पारा
सूचिप्पारा हा वायनाडमधील एक सुंदर आणि जोरदार धबधबा आहे. या कार्यक्रमाने प्लास्टीक प्रदूषणाची समस्या शोधून काढली ज्यामुळे धबधब्याच्या पाण्याचा दर्जा, रूप आणि परिसर खराब होत आहे. पर्यावरण जबाबदारी कार्यक्रमाचा भाग म्हणून, आरटी विभागाने सूचिप्पारा येथे टूरिझम क्लबद्वारे समाज प्रबोधन आणि स्वच्छता कार्यक्रम हाती घेतला होता.    

पूकोट तळे
पूकोट हे वायनाड येथील ताज्या पाण्याचे तळे जेथे दरवर्षी पुष्कळ संख्येने पर्यटक येतात. पूकोट तळ्याच्या परिसरातही सूचिप्पाराप्रमाणे प्लास्टिक प्रदूषणासारख्या त्याच समस्या निर्माण झाल्या. जबाबदार पर्यटनाने जागृति चळवळ आणि स्वच्छता कार्यक्रम याही ठिकाणी घेतल्याने या समस्यांना उत्तर देता आले.              

पर्यावरण सर्वेक्षण
आरटी विभागाने वायनाडमध्ये 17 ठिकाणी पर्यावरणविषयक सर्वेक्षण केले ज्यातून हॉटेल्स आणि रेसॉर्ट्सची प्राथमिक माहिती, पर्यावरणविषयक धोरणे आणि ऊर्जा व्यवस्थापन पद्धती यांची माहिती मिळाली.     

स्ट्रीटलाईट सर्वेक्षण
विथरी पंचायत येथील स्ट्रीट लाईट्सच्या कार्यक्षमतेचे मापन करण्यासाठी, आरटी विभागाने या क्षेत्रातील स्ट्रीट लाईट्सच्या कार्यक्षमतेविषयी एक सर्वेक्षण घेतले आणि त्याचा अहवाल पंचायतीला दिला. या अहवालानुसार पंचायतीने कारवाई केली.                 

पवित्र उपवनांचे सर्वेक्षण
पवित्र उपवने म्हणजे मानव निर्मित भू-स्थलांवर उगवलेले हरित पट्टे. त्यांचे जतन करणे आवश्यक असते कारण ते जैववैविधता म्हणून अनोखे आहेत. या पार्श्वभूमीवर एक सर्वेक्षण केले गेले, ज्यात या भागातील सर्व पवित्र उपवनांचा समावेश केला गेला.              

कोवलम
कोवलम येथील कार्यशाळा 8 मे 2000 ला झाली. या कार्यशाळेत अनेक प्रकारचे भागधारक सहभागी झाले ज्यात उद्योग भागीदार (हॉटेल मालक, रेस्टॉरन्ट संचालक, टूर संचालक, ट्रॅव्हल एजन्ट, होम स्टे संचालक, स्मृतिचिन्ह दुकानांचे मालक, पर्यटन उत्पादने पुरवीणाऱ्या अन्य एजन्सी), लोकप्रतिनिधी,  सरकारी प्रतिनिधी, स्थानिक-स्वराज्यसंस्था, पर्यटन उद्योग, नागरी संस्था, शिक्षणतज्ज्ञ, मिडिया आणि विधानसभा सदस्य यांचा समावेश होता.         

ही कार्यशाळा तीन सत्रांमध्ये विभागली होती, उद्घाटन सत्र ज्यात कार्यशाळेच्या विषयाची प्रस्तावना, सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणविषयी गटचर्चा आणि गटाने केलेल्या संशोधनाचे सादरीकरण आणि त्यानंतर आंतर-गट चर्चा, आरटी कार्यक्रमात सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या हॉटेल मालकांकडून अन्डरटेकिंगवर सही, डेस्टिनेशन लेवल रिस्पॉन्सिबल टूरिझम कमिटी (डीएलआरटीसी) याची कार्यक्रम पुढे सुरू रहायच्या दृष्टीने स्थापना. 

या ठिकाणी हे प्रयत्न पुढेही चालू रहावेत म्हणून, एक महत्त्वाचा निर्णय घेतला गेला तो म्हणजे, डेस्टिनेशन लेव्हल रिस्पॉन्सिबल टूरिझम कमिटी (डीएलआरटीसी) ची स्थापना जी समिती कोवलमसाठी जबाबदार पर्यटन कार्यक्रम राबवेल व त्याचे पर्यवेक्षणही करेल.डिएलआरटीसीमध्ये आहेत, DLRTC मध्ये श्री पन्न्यन रवीन्द्रन M.P., श्री जॉर्ज मेरिजर विधानसभा सदस्य, श्री अनवुर नागप्पन, जिल्हा पंचायत प्रमुख, श्रीमती अनीता, ब्लॉक पंचायत प्रमुख हे आश्रयदाते म्हणून आहेत तर  अध्यक्ष म्हणून ग्राम पंचायत मुख्य आहेत. सचिव, DTPC हे संयोजक असतील आणि सर्व सहभागी जसे स्थानिक स्वराज्य संस्थांचे, सांस्कृतिक संस्था, संघटना, बिगर-सरकारी संस्था, मीडिया, कुडुम्बश्री इ. चे प्रतिनिधी हे डीएलआरटीसीचे सदस्य असतील.

झीरो टॉलरन्स मोहीम
कोवलममध्ये ही मोहीम बाल लैंगिक शोषण याविरोधात होती जी जबाबदार पर्यटनच्या बॅनरखाली आयोजित करण्यात आली होती. या सामाजिक विकृतीची वास्तवातील स्थिती, स्त्रोत आणि कारणे समजून घेतल्यानंतरच ही योजना आखण्यात आली. हा मुद्दा कोवलममधील गंभीर समस्यांपैकी एक म्हणून उठवण्यात आला. ही समस्या सोडविण्यासाठी आणि आवश्यक ती खबरदारी घेण्यासाठी आरटी सेलला एनजीओ आणि संबंधित संस्थांचा पाठिंबा मिळाला. ‘बी ए गार्ड ऑफ एन्जेल (छोट्या परीचे संरक्षक बना)’ असा या मोहिमेचा विषय होता. कोवलममध्ये सर्व संपत्तीवर पोस्टर, पत्रक आणि डोअर हॅंगर्स इत्यादी लावलेले होते. आरटी सेलने ह्या मोहिमेची खूप गंभीरतेने पहाणी केली आणि सर्व इमारतींवर ह्या गोष्टी योग्य रितीने लावल्या जातील ह्याची खबरदारी घेतली.          

कार्तिक उत्सव-एक मॉडेल
कार्तिक उत्सव आरटी सेलचा कोवलममध्ये एक सफल प्रयत्न होता.सर्व भागीदारांच्या सहभागाचा आणि मीडीया कवरेजचा हा प्रत्यक्ष पुरावा होता. ह्या आयोजनामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांचे संचालन, कुडूम्बश्री आणि समुदाय सदस्यांचा सक्रिय सहभाग आणि उद्योगांचे अधिक चांगले प्रयत्न ह्या गोष्टी स्पष्ट झाल्या.       

ह्या कार्यक्रमाचे आयोजन आरटी सेलच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते आणि कुडूम्बश्री उद्योगाने ह्याला प्रायोजकत्व देऊन आपला भरघोस पाठिंबा दर्शविला. प्रत्येक जळणार्‍या दिव्याने औद्योगिक भागीदारीचे प्रतिनिधित्व केले आणि ह्या दिव्यांच्या उत्सवात अजून रंग भरले. हे दिवे केळीच्या खांबाला खाचा पाडून त्यात ठेवण्यात आलेले होते. त्यांनी कुडूम्बश्रीच्या सदस्यांना नवीन दृष्टिकोन आणि ऊर्जा दिली. ह्या एका दिवसाच्या कार्यक्रमाने समूहाला रु. 29,000 रुपयांची मदत मिळाली.    

श्रम संचालनालय
पर्यटन क्षेत्रात स्थानिक श्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी आरटी सेलने कोवलमच्या वेगवेगळ्या सेक्टरमध्ये काम करणार्‍या श्रमिकांची माहिती गोळा केली. त्याने वेगवेगळ्या क्षेत्रांच्या आवश्यकतेनुसार तज्ञ आणि व्यावसायिकांची उपलब्धता निश्चित केली.       

व्हिलेज लाईफ एक्सपिरिएन्स पॅकेज
समुद्र किनारा तसेच तलाव आणि जनजीवन ह्या एक दिवसाच्या सहलीं व्यतिरिक्त अर्ध्या दिवसाची सहल, कोवलममधील व्हिलेज लाईफ एक्सपिरिएन्स पॅकेजच्या दोन सहली आहेत. व्हीएलई पॅकेजची निर्मिती आणि कार्यान्वयन केरळ पर्यटन विभागामार्फत केले जाते, जे अतिशय कल्पक आणि दूरदृष्टी असलेल्या जबाबदार पर्यटन (आरटी)च्या संकल्पनांचा एक भाग आहे. व्हिलेज लाईफ एक्सपिरिएन्स पॅकेजच्या रूपात ब्रँडेड असलेल्या ह्या पॅकेजचे उद्दिष्ट आहे सध्याच्या पर्यटन पद्धतींना नवीन मोजमाप देणे आहे आणि ‘अर्थपूर्ण आणि परस्पर लाभदायी पर्यटन’ ला उत्तेजन देणे आहे, जेथे पर्यटक आणि यजमान ह्यांच्यात सुसंवाद निर्माण होऊ शकेल. व्हिलेज लाईफ एक्सपिरिएन्स पॅकेजची संकल्पना प्रथम कोवलममध्ये वापरण्यात आली जी सामाजिक जबाबदारी कार्यक्रमाचा एक भाग होती. नावाप्रमाणेच, व्हिलेज लाईफ एक्सपिरिएन्स पॅकेजचे उद्दिष्ट आहे पर्यटकांना कमी प्रसिद्ध, पण गावातल्या सगळ्यात आकर्षक स्थळांचा परिचय करून देणे ज्यामुळे पर्यटनातून मिळणारा लाभ ह्या समुदायांपर्यंत पोहचविता येऊ शकेल.     

व्हिलेज लाईफ एक्सपिरिएन्स पॅकेज, पर्यटन स्थळाची पारंपरिक उपजिविका, संस्कृती आणि जीवनशैली लक्षात घेऊन तयार करण्यात आलेले आहे. पॅकेजच्या नावाचे व्हीएलई हे संक्षिप्त रूप असून, पॅकेजचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे मिळालेल्या उत्पन्नाचा जास्तीत जास्त हिस्सा समुदायांना दिला जातो. पॅकेजची मूळ किंमत अशाप्रकारे तयार करण्यात आलेली आहे की अंदाजे 65-70% लाभ स्थानिक समुदायांच्या यजमानांना मिळेल, जो प्रत्येक पॅकेजसोबत भागीदारी करेल. व्हीएलईचा विकास स्थानिक समुदायाला त्यांचे उपजिविका करण्याचे पारंपरिक कार्य चालू ठेवण्यासाठी प्रोत्साहन देणे, स्थानिक प्रतिभांचा आदर करणे आणि पूरक कार्याच्या रूपात पर्यटनापासून अतिरिक्त प्राप्ती करणे ह्या हेतूंसाठी करण्यात आला आहे.
 
हे पॅकेज स्थानिक समुदायांना अभ्यागत/पर्यटकांशी ओळख करून देते, ज्यामुळे ते ह्या वेगवेगळ्या क्रियांना ग्रामीण वातावरणत योग्य रीतीने कार्यान्वित करण्याचा अनुभव घेऊ शकतील. पर्यटक आणि पर्यटन उद्योगासाठी पॅकेजला उत्तेजन देणे आणि बाजारपेठ मिळवूने देणे याकरिता कल्पक मार्केटिंग धोरण अतिशय आवश्यक आहे.    

कोवलममधील नफा वितरण योजना खालील सारणीत दर्शविण्यात आली आहे.:

अनु. क्र. तपशील रु.
1 फूलांचे दुकान 50
2 नारळाची पाने 50
3 कॉयर सोसायटी 50
4 शून्य कचरा 100
5 बालवाडी 50
6 लोहार 50
7 लॉब्स्टर 150
8 कलारी 500
9 लंच 100
10 पूर्णिमा 150
11 हॅंडलूम 100
12 मासेमारी 200
13 वाहन 1500
14 शहाळे 100
15 गाईड शुल्क 300
16 अन्य 500

स्थळ विकास योजना - कोवलम
कोवलम डेस्टिनेशन(स्थळ) मार्फत हॉटेलमध्ये पर्यावरण सर्वेक्षण, सामाजिक सर्वेक्षण, कोअर सर्वेक्षण, प्लास्टिकच्या पिशव्यांच्या जागी कागदाच्या पिशव्यांचा वापर इत्यादींचे आयोजन करण्यात आले होते.

तेक्कडि
तेक्कडि येथील कार्यशाळा 23 जून 2007 पेरियार हाऊस येथे झाली. या कार्यशाळेत अनेक प्रकारचे भागधारक सहभागी झाले ज्यात उद्योग भागीदार (हॉटेल मालक, रेस्टॉरन्ट संचालक, टूर संचालक, ट्रॅव्हल एजन्ट, होम स्टे संचालक, स्मृतिचिन्ह दुकानांचे मालक, पर्यटन उत्पादने पुरवीणाऱ्या अन्य एजन्सी), लोकप्रतिनिधी,  सरकारी प्रतिनिधी, स्थानिक-स्वराज्यसंस्था, पर्यटन उद्योग, नागरी संस्था, शिक्षणतज्ज्ञ, मिडिया यांच्या प्रतिनिधींचा समावेश होता.          

उद्घाटन सत्राचे संचालन केरळ पर्यटनाचे संचालक आइ.ए.एस श्री संजय कौल यांनी केले. कुमली पंचायतीचे अध्यक्ष श्री एम.एस वासु यांनी परिषदेचे स्वागत केले. आइ.ए.एस तसेच केरळ पर्यटनाचे सचिव डॉ. वेणु यांनी जबाबदार पर्यटन या विषयाचे सादरीकरण केले. कुडूम्बश्री (महिलांचे स्वयं-सहाय्यता गट) चे संचालक, आइ.ए.एस श्रीमती शारदा मुरलीधरन यांनी कुडूम्बश्रीच्या सद्य परिस्थितीची आणि स्थानिक अर्थव्यवस्थेतील भूमिकेबद्दल तसेच महिला सशक्तीकरण, गरीबी उन्मूलन, पर्यावरण सुरक्षा इ. विषयांबद्दल सांगितले. अतिरिक्त संचालक (नियोजन आणि प्रकल्प), केरळ पर्यटन चे श्री यू.वी जोस यांनी कार्यशाळेचा कार्यक्रम थोडक्यात सांगितला. आइ.एफ.एस ईको टूरिज्म चे संचालक-  श्री टी पी नारायण कुट्टी, KITTS चे प्रमुख श्री बी. विजयकुमार, कुडूम्बश्री चे प्रोग्राम अधिकारी श्री जगजीवन इत्यादींनी यात सहभाग घेतला. आर्थिक तसेच सामाजिक जबाबदारीवरील गटचर्चेचे संचालन क्रमशः श्री टी पी नारायणमूर्ति, निदेशक ईको-टूरिज्म आणि श्री जगजीवन, कुडूम्बश्री यांनी केले.


तेक्कडि येथे हे प्रयत्न पुढेही चालू रहावेत म्हणून, एक महत्त्वाचा निर्णय घेतला गेला तो म्हणजे, डेस्टिनेशन लेव्हल रिस्पॉन्सिबल टूरिझम कमिटी (डीएलआरटीसी) ची स्थापना जी समिती तेक्कडिसाठी जबाबदार पर्यटन कार्यक्रम राबवेल व त्याचे पर्यवेक्षणही करेल. डिएलआरटीसी मध्ये विधानसभा सदस्य, जिल्हा पंचायत प्रमुख, ब्लॉक पंचायत प्रमुख हे आश्रयदाते म्हणून होते तर  अध्यक्ष म्हणून ग्राम पंचायत मुख्य होते.  सचिव, DTPC हे संयोजक होते आणि सर्व सहभागी जसे स्थानिक स्वराज्य संस्थांचे, सांस्कृतिक संस्था, संघटना, बिगर-सरकारी संस्था, मीडिया, कुडुम्बश्री इ. चे प्रतिनिधी हे डीएलआरटीसीचे सदस्य होते.  डीटीपीसी सचिवांनी सर्व सहभागींचे त्यांच्या कार्यशाळेतील क्रियाशील सहभागाबद्दल आभार मानले. दुपारी 2.30 वाजता कार्यशाळा संपली. ही प्रक्रिया समृद्धी समूहाच्या कार्यान्विततेने आणि कुमिली येथे आरटी शॉप उघडण्याने झाली. उपलब्ध उत्पादनांनी खरेदी आणि पुरवठा अखंड झाला आहे. मात्र येथे दर्जा आणि किंमतीवर तामिळनाडू बाजाराच पुष्कळ प्रभाव पडतो. पण व्यवस्था मूल्यवर्धन आणि दर्जा उंचावण्याचे पूर्ण प्रयत्न करत आहेत. उत्पादन क्षेत्राला स्थिर करण्यासाठी आणि समन्वयासाठी अधिक प्रयत्न आवश्यक आहेत. तसेच या क्षेत्रातील अनेकविध वैशिष्ट्यांना पाहता, स्थानिक खरेदीला अधिक प्रभावी बनविण्याची आवश्यकता आहे.

तेक्कडिचे केरळ कॅफे
तेक्कडिच्या आदिवासींद्वारा चालविण्यात येणारे हे अल्पोपहाराचे दुकान आहे.तेक्काडीमधे पाच महिलांच्या गटाने क्लब महिंद्रा रिसॉर्टमधे आरटी डेस्टिनेशन सेल यांच्या पुढाकाराने याची स्थापना केली आहे.गटाने केरळ टी शॉपने सुरुवात केली,जे पाहुण्यांना पारंपारिक केरळी अल्पोपहाराचे पदार्थ तयार करते आणि पुरवीते. दुकानातील कामाची वेळ दुपारी 3.00 ते संध्याकाळी 6.00 आहे.                   

व्हीलेज लाईफ़ एक्सपिरीअन्स पॅकेज
सोशल रीस्पॉंसिबिलिटी (सामाजिक जबाबदारी) म्हणून,आरटी सेलने तेक्कडिमधे व्हीलेज लाईफ़ एक्सपिरीअन्स पॅकेज ही योजना सुरु केली आहे.हे पॅकेज पूर्णपणे तेक्कडिच्या आदिवासींद्वारा चालविले जाते. यामुळे पर्यटकांना इष्ट स्थानाच्या ग्रामिण जीवनाबद्दल अधिक माहिती मिळविण्यास मदत करते आणि पर्यटकांना त्या ठिकाणच्या जातीजमातीच्या पारंपारिक जीवनाचा अनुभव देऊ करते. या पॅकेजमधे तेरा उपक्रम आहेत. 


 

Photos
Photos
information
Souvenirs
 
     
Department of Tourism, Government of Kerala,
Park View, Thiruvananthapuram, Kerala, India - 695 033
Phone: +91-471-2321132 Fax: +91-471-2322279.

Tourist Information toll free No:1-800-425-4747
Tourist Alert Service No:9846300100
Email: info@keralatourism.org

All rights reserved © Kerala Tourism 1998. Copyright Terms of Use
Designed by Stark Communications, Hari & Das Design.
Developed & Maintained by Invis Multimedia