Trade Media
     

कुमरकमची सामाजिक जबाबदारी

     
 
कुमरकम येथील जबाबदार पर्यटनाअंतर्गत सामाजिक जबाबदारीयुक्त कार्यक्रमांची सुरुवात सप्टेंबर, 2008 मध्ये झाली.याआधारे समाजाच्या अधिक जवळ गेल्याने शेतीचा विकास झाला आणि येथील चांगल्या शक्यतांचा सुगावा लागला.

a. सुवर्ण सांस्कृतिक समूह

या क्षेत्रामध्ये गृहिणींचा समावेश झाल्या कारणाने सुवर्ण सांस्कृतिक समूह या समूहाची स्थापना केली गेली, जी पर्यटकांसाठी पारंपारिक कलांचे (तिरूवतिरा, कोलकली, वट्टकली) प्रदर्शन करते. जबाबदार पर्यटनाचा आणखी एक फ़ायदा असा कि यामुळे मुलांमार्फ़त व्यावसायिक शिंकरी मेलम समूहाची स्थापना करण्यात आली. या समूहात आठ ते चौदा वर्षातील मुला-मुलींचा समावेश आहे, जो केरळमधील पहिला बाल शिंकरी मेलम समूह आहे. आता कुमरकमच्या या सांस्कृतिक समारोहात महिला आणि मुलांची अनेक छोटी छोटी मंडळे भाग घेतात.याठिकाणी चालणारी हस्तकला-व्यवसाय आणि चित्रकला व्यवसाय विभागामधूनही लाभ होत आहे. त्याचबरोबर सॉविनिअर / स्मृतिचिन्हांचा विकास आणि याचे विपणन यांचादेखील विकास होत आहे. 

b. जीवनाचा शोध

कुमरकम मधील अस्पर्शित ग्रामीण जीवनाचा अनुभव घेण्यासाठी पॅकेजांचा आरंभ केला गेला.-कुमरकममधील ग्रामीण जीवनाचा अनुभव’ आणि ’शेतकर्‍यांबरोबरचा एक दिवस’. या कार्यक्रमांमधून प्राप्त झालेले उत्पन्न यात भाग घेणार्‍या परिवारांमध्ये वाटले जाते.अशाच प्रकारच्या आणखी दोन पॅकेजेसची सुरूवात प्राथमिक स्तरावर केली गेली आहे.

c. समुदाय आधारित पर्य़टन

समुदाय आधारित पर्यटनाचा एक भाग म्हणून अनेक नवनवीन संकल्पना निर्माण झाल्या. महोत्सव दिनदर्शिका हा त्याचाच एक नमुना आहे, ज्यात सण आणि त्यांचे इतिहास यांबाबत संपूर्ण माहिती दिली जाते. पर्यटन स्थळांची माहिती, त्यांची निर्देशिका, तसेच संसाधन मापन यांमध्ये पर्यटन स्थळे तसेच पर्य़टनाच्या व्यापक संधींबाबत उत्तम रूपरेषा प्राप्त होते.हॉतेल आणि रिसॉर्ट्सच्या सहयोगातून या क्षेत्रामध्ये पिण्याच्या पाण्याच्या समस्यांचे निराकरण होण्यासाठी साडेबारा लाख रुपयांची गुंतवणूक केली गेली आहे. जबाबदार पर्यटनांतर्गत सामाजिक जबाबदारीचा एक भाग म्हणून डेस्टिनेशन लेबर डिरेक्टरी, ग्रामीण पर्यटनात उत्पन्न होणार्‍या सामाजिक समस्यांचा अभ्यास करणे, त्याच बरोबर त्यांचे निराकरण करणे, सुविधांमधील उणिवा भरून काढणे, या क्षेत्रातील सुरक्षेचे मुद्दे आणि त्यावरचे उपाय यासर्वांबाबत काम पाहते. मूळ डेस्टिनेशन सर्वेक्षणामार्फ़त 463  तसेच सामाजिक पर्यटनामार्फ़त 283  घरांकडून पुष्कळ प्रतिसाद प्राप्त झाला आहे.
 

d. पर्यावरणीय जबाबदारी

सिंहावलोकन:
  • रस्त्यावरील दिव्यांबाबतचे सर्वेक्षण संपन्न झाले.
  • उद्योगधंद्याचे सर्वेक्षण चालू आहे.
  • प्लास्टिक मुक्त क्षेत्राची घोषणा
  • पर्यायी इको-फ्रेंडली उत्पादने
  • सदाबहार संरक्षण योजना लागू
  • जैविक शेतीस सुरूवात झाली.
  • हॉटेल आणि रिसॉर्ट्समध्ये पर्यावरण-अनुकूल पद्धतींना सुरुवात झाली.
  • शून्य कचरायुक्त कुमकरम- या योजनेची तयारी पूर्ण झाली.
  • संसाधन मापन पूर्ण झाले.
 
     
   
     
  जबाबदार पर्यटनामुळे कुमरकमच्या मूळ क्षेत्रामधे पर्यावरण विकासाचा मार्ग खुला झाला आहे. रस्ते आणि रस्त्यांवरील दिव्यांचे सर्वेक्षण केले गेले, तसेच, सरकारने त्वरित प्रयत्न केल्यामुळे अडचणी सोडवण्यात खूप मोठी मदत झाली. प्लॅस्टिकच्या कचऱ्यावर नियंत्रण आणि त्याची विल्हेवाट हा आरटी योजनेचा भाग म्हणून घडून आलेला एक क्रांतीकारी बदल होय. या भागातील प्लॅस्टिकचा कचरा स्वच्छ करण्यासाठी अतिशय कडक नियम अमलात आणले गेले. समृद्धी अक्टिव्हीटी ग्रूपच्या मदतीने कागदी व कापडी पिशव्या वापरण्यास प्रोत्साहन दिले गेले. कुमरकम कचरामुक्त करण्यासाठी राबवण्यात आलेल्या ‘झीरो वेस्ट कुमरकम’ ही योजना प्राथमिक प्रक्रियेमधे कार्यरत आहे.   
     
   
     
  a. पडीक जमिनींबाबत सकारात्मक दृष्टीकोन

पडीक जमिनींना कृषीयोग्य बनवणे हे जबाबदार पर्यटनाचे मुख्य उद्दिष्ट आहे. 56 एकर जमिनींचा विकास करून त्यातून भाज्या आणि औषधी वनस्पतींचे उत्पादन घेतले गेले. रोजगार मिळवून देणारा हा यशस्वी कार्यक्रम कुमरकमच्या अन्य भागांमधूनही सुरु झाला असून तो अन्य ठिकाणी पोहोचतो आहे.

b. मॅनग्रोव्ह संरक्षण

कुमरकममधे मॅनग्रोव्ह या प्राकृतिक वनस्पतीवर विशेष लक्ष केंद्रित केले गेले आहे. मॅनग्रोव्ह चे संरक्षण करण्यासाठी ‘कंदलमच्ची’ या स्थानिकाच्या पुढाकाराने कंडल च्या बिया घरोघर पोचवल्या गेल्या.

c. मत्स्य-पालन

या भागातील पडीक तलावांचे सर्वेक्षण केले गेले. अभ्यास व संशोधनाच्या आधारे या तलावांमधे मत्स्य-पालन आणि कमळांची शेती सुरु केली गेली. माशांचा वापर खाद्य म्हणून केला जातो, तर कमळाचे फूल देऊन येणाऱ्या पर्यटकांचे औपचारिक स्वागत केले जाते. आता तेथील ग्रामीण लोकांसाठी ही एक संपत्ती बनून गेली असून ते आता याचा प्रचार अनेक भागांमधे करत आहेत.


d. सायकल पर्यटन

पर्यटन योजनांमधे सायकल पर्यटनाचा समावेश केला गेला आहे. या योजनेमधला सायकलिंगचा थरारक अनुभव पर्यटकांना आकृष्ट करतो, आणि त्यामुळे मागणी वाढते. विविध हॉटेल्स व रिसॉर्ट्स आता भाडेतत्वावर सायकली पुरवू लागले असून, आता हा एक उत्तम व्यवसाय होऊन गेला आहे.


e. पक्षी अभयारण्यांचे महत्त्व

पक्षी अभयारण्यांच्या बाबतीत असलेल्या पर्यटनाच्या संधी लक्षात घेता, जबाबदार पर्यटनांतर्गत, अनेक पावले उचलली गेली आहेत. पक्षी-जीवनाचा अभ्यास, पक्षी मोजणीचे सर्वेक्षण,  त्यांच्याविषयीची अधिक माहिती, पर्यटक व्यवस्थापन, व पक्षी निरिक्षणासाठी अन्य अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत. 
 
     
   
     
  आजू-बाजूचा परिसर निसर्ग-पोषक बनवतानाच, हॉटेल्समधील ऊर्जा व्यवस्थापन व या क्षेत्रातील  कचऱ्याचे व्यवस्थापन यावर पुरेसे लक्ष केंद्रित केले गेले. पर्यटन उद्योगातील भागीदार(हॉटेलमालक, रेस्टॉरन्ट्सचे मालक, टूर ऑपरेटर्स, ट्रॅव्हल एजन्ट्स, होम-स्टे ऑपरेटर्स, वस्तु-विक्री केंद्रचालक, पर्यटनसेवा उप्लब्ध करून देणाऱ्या एजन्सीज), स्थानिक प्रशासनाचे प्रतिनिधी, जन-प्रतिनिधी, एनजीओ’ज/सीएसओ’, शासकीय आधिकारी, अकादमीचे सदस्य, पत्रकारिता इ.च्या संपूर्ण सहकार्यामुळे केवळ दोन वर्षातच सफलता प्राप्त झाली आहे. कुमरकम हे जबाबदार पर्यटनाची जाणीव झालेले राज्यातील पहिलेच पर्यटन स्थळ असून, जगाला आपली यशोगाथा सांगत आता ते संपूर्ण पर्यटन क्षेत्रात आदर्श बनून राहिले आहे.  


 

Photos
Photos
information
Souvenirs
 
     
Department of Tourism, Government of Kerala,
Park View, Thiruvananthapuram, Kerala, India - 695 033
Phone: +91-471-2321132 Fax: +91-471-2322279.

Tourist Information toll free No:1-800-425-4747
Tourist Alert Service No:9846300100
Email: info@keralatourism.org

All rights reserved © Kerala Tourism 1998. Copyright Terms of Use
Designed by Stark Communications, Hari & Das Design.
Developed & Maintained by Invis Multimedia