तुल्लल हा नृत्यप्रकार आहे ज्यात नृत्य आणि श्लोकांद्वारे कथन याचा समावेश असतो. मंदीर उत्सवात सादर होणारा हा प्रकार, कलाकार श्लोकांचा अर्थ हावभावाद्वारे व्यक्त करतात. विषय पुराणसंबंधी असतो. हा उपरोधात्मक कलाप्रकार प्रसिद्ध कवी कंचन नाम्बियार यांनी 18 व्या शतकात सुरू केला.
विनोद, उपरोध आणि सामाजिक टीका हे तुल्लालचे विशेष आहेत. मेक-अप साधा असला तरी कथकलीसदृश असतो. तुल्लाल नर्तकासह एक गायक असतो जो श्लोक पुन्हा म्हणतो आणि त्याच्या जोडीला, मृदंग किंवा थोप्पी मंडलम (तालवाद्य)आणि झांजा यांचा वाद्यवृंद असतो. तुल्ललशी संबंधित तीन प्रकार आहेत, ओट्टनतुल्लल, सीतनकन्थुल्लल, परायणतुल्लल, ज्यातील पहिला सर्वात प्रसिद्ध आहे. तिघांमध्येही पोषाख आणि श्लोकांचे छंद यात फरक असतो.
तुल्लाल हे नेहमी मंदीर परिसरात उत्सवात केले जाते आणि या उत्सवांना येणाऱ्या हजारो लोकांचे मनोरंजन करून त्यांच्यापर्यंत विचार पोहोचवते.
Department of Tourism, Government of Kerala, Park View, Thiruvananthapuram, Kerala, India - 695 033
Phone: +91-471-2321132 Fax: +91-471-2322279.
Tourist Information toll free No:1-800-425-4747
Tourist Alert Service No:9846300100
Email: info@keralatourism.org