भारतातील सर्वात सुशिक्षित आणि सामाजिक दृष्ट्या प्रगत अशा केरळी लोकांना मिळाली आहे विश्वबंधुत्त्वाची दृष्टी, जी त्यांच्या सहिष्णुतेमधून आणि उदारतेमधून दिसून येते. याचे श्रेय जाते केरळमधील बहुविधतेने भरलेल्या संस्कृतीला जिला जगभरातील अनेक प्रदेशांनी आणि वंशांनी योगदान दिले आहे.
वर्षानुवर्षांपासून केरळने मानवी जीवनाच्या प्रत्येक पैलूत नवीन परंपरांना आणि मूल्यांना स्विकारण्याची विलक्षण क्षमता दाखवून दिली आहे. बदलांना आणि आव्हानांना सामोरे जाण्याच्या याच वृत्तीमुळे केरळी लोक आणि समाज इतरांपेक्षा वेगळे आहेत.
केरळी लोकांमध्ये खूप प्रमाणात दक्षता आणि राजकीय जागृती दिसून येते. शैक्षणिक क्षेत्रातही, केरळी लोकांचे स्थान विशेष आहे. येथील स्त्रियांच्या साक्षरतेचे प्रमाण आशियातील सर्वाधिक प्रमाणांपैकी एक आहे. यामुळेच या राज्यात स्त्रियांना कुटुंबात आणि समाजातही वेगळे स्थान दिसते.
Department of Tourism, Government of Kerala, Park View, Thiruvananthapuram, Kerala, India - 695 033
Phone: +91-471-2321132 Fax: +91-471-2322279.