कुट्टियट्टम चा शब्दशः अर्थ आहे, “एकत्र अभिनय”. केरळमधील सर्वात प्राचीन शास्त्रीय नाट्यकला प्रकारांपैकी हा एक आहे. दुसऱ्या शतकातील भरत मुनींच्या नाट्यशास्त्रावर आधारित असे हे कुट्टियट्टम 9व्या शतकात विकास पावले.
कुट्टियट्टम हे मंदिराच्या रंगमंचावर सादर केले जाते, त्यात दोन किंवा अधिक व्यक्तिरेखा एकावेळी मंचावर असतात आणि यात चक्कियार पुरुष पात्रं करतात आणि नंगियार स्त्री पात्रं. नंगियार झांजा वाजवतात आणि संस्कृत श्लोक म्हणतात तर पार्श्वभूमीला नंबियार मिझवू म्हणजे तांब्याचा ढोल वाजवतात.
विदूषक किंवा चतुर उपनायक ही व्यक्तिरेखा शेक्स्पीयरच्या नाटकांमधील ’फूल’ या पात्रासारखी असते जी कोणावरही निर्धास्तपणे टीका करते. विदूषकाची वेशभूषा त्याला अन्य पात्रांपेक्षा वेगळी बनविते. कुट्टियट्टमचे सादरीकरण अनेक दिवस, साधारण 6 ते 20 दिवस चालते. विषय पुराणावर आधारित असतात.
त्रिशूरचे वडक्कुमनाथ मंदीर आणि इरिंजलक्कुडा चे कूडल माणिक्यम मंदीर ही कुट्टियट्टमची मुख्य केंद्रे असून येथे कुट्टियट्टम वार्षिकरूपात सादर केले जाते. अम्मन्नूर माधव चक्कियर हे या कलेचे नावाजलेले कलाकार आहेत.
Department of Tourism, Government of Kerala, Park View, Thiruvananthapuram, Kerala, India - 695 033
Phone: +91-471-2321132 Fax: +91-471-2322279.
Tourist Information toll free No:1-800-425-4747
Tourist Alert Service No:9846300100
Email: info@keralatourism.org