कुंभलंगी इंटिग्रेटेड टूरिस्ट विलेज ( पर्यटक गाव) प्रोजेक्ट हा एक अनोखा कार्यक्रम आहे ज्याद्वारे हे लहानसे बेट एक नमुना मासेमारी गाव आणि पर्यटन ठिकाण बनले आहे. कुंभलंगी पर्यटक गावात, पर्यटक अनेक प्रकारच्या नैसर्गिक वैभवाचा तसेच या स्थानाच्या जैवमंडलीय संतुलनाचा अनुभव घेऊ शकतात. देशातील याप्रकारचे हे पहिले गाव असून एर्नाकुलम जिल्ह्यातील कोची या बंदर शहराजवळ आहे. पर्यटकांसाठी ही एक वैविध्यपूर्ण मेजवानी आहे जेथे प्रसिद्ध चायनीज मासेमारी जाळ्यांसह अनेक दृश्यांचा आनंद घेता येतो.
कुंभलंगी मॉडेल व्हिलेज प्रोजेक्टच्या कलेच्या रूपात, पल्लुरथी जवळील बेटावर नजीकच्या भविष्यात अनेक सुंदर दृश्ये आणि कार्यक्रम विकसित होणार आहेत. किनाऱ्यांवरील वस्त्या गावकऱ्यांच्या साध्या पण समृद्ध जीवनाचे दर्शन घडवतात त्याच बरोबर या ठिकाणच्या प्राचीन संस्कृतीचे दर्शन घडवतात.
येथे पोहोचण्यासाठी:
- जवळचे रेल्वे स्थानक: एर्नाकुलम् जंक्शन, 25 किमी दूर
- जवळचा विमानतळ: कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ, 40 किमी दूर.