स्थान: थलासेरीपासून सुमारे 35 कि.मी व कन्नूर शहरापासून सुमारे 60कि.मी.
अरलम अशू-अभयारण्य हे पश्चिम घाटाच्या उतारावरील, सुमारे 55 चौ.कि.मी. उंच-सखल वन्यक्षेत्रावर पसरले आहे. कट्टी-बेट्टा हे येथील सर्वोच्च शिखर असून त्याची उंची समुद्रसपाटीपासून सुमारे 1145 मी. आहे.
उष्णकटीबंधीय व अर्ध-सदाहरीत प्रकारच्या जंगलांमधे पसरलेले अरलम पशू-अभयारण्य हे पश्चिम घाटातील अनेक स्थानिक प्राणी व वनस्पतींचे आश्रयस्थान आहे. येथे हत्ती, गौर, सांबर, ठिपकेदार हरणे, बार्कींग डिअर, निलगिरी वानरे, हनुमान वानरे, मोठ्या मलबारी खारी इ. प्राणी आढळून येतात.
थलासेरी मधील हे अरलम गाव तेथील 3060 हेक्टर प्रदेशावरील सेंट्रल स्टेट फार्मसाठी देखील प्रसिद्ध आहे. याची स्थापना 1971 मधे भारत सरकारद्वारे केली गेली. संकरित नारळ बियाणे तयार करण्याचे हे देशातील प्रमुख केंद्र आहे.
येथे पोहोचण्यासाठी:
- जवळचे रेल्वेस्थानक: थलासेरी, सुमारे 35 कि.मी.
- जवळचा विमानतळ: कारीपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ, कोझिकोड, थलासेरी शहरापासून सुमारे 71 कि.मी.