थिरुवनंतपुरम ह्या राजधानीच्या शहराजवळ असणारा मानकयम नेदुमंगड तालुक्यातल्या पलोड जवळ आहे. धबधब्याच्या ह्या देखाव्याचा आनंद तुम्ही वर्षातून कधीही घेऊ शकता. अलीकडेच मानकयमला पर्यावरण पर्यटन क्षेत्राच्या रूपात प्रदर्शित करण्य़ात आले होते, ज्याचे आयोजन राज्याच्या वन विभागाने केले होते.
मानकयम पर्यावरण पर्यटन क्षेत्रात, पर्यटक गाईडचे मार्गदर्शन घेऊ शकतात. राज्याच्या वन विभागाच्या अखत्यारित कार्य करणार्या वनसंरक्षण समितीद्वारे इथल्या सर्व क्रियाम्मध्ये समन्वय साधला जातो.
चेमंची पर्वत रांगांमधून वर येत चित्तर नदी ब्राइमोर जंगलातून जात मानकयम नदीच्या रूपात एक उपनदी तयार करते. मानकयम नदी पुढे जाऊन दोन सुंदर धबधबे तयार करते. एक कलकयम इथे आहे, जो ह्या भागातल्या सगळ्यात मोठ्या धबधब्यांपैकी एक आहे आणि दुसरा कुरुस्सदी इथे आहे. कलकयम आणि कुरुस्सदी इथले सुंदर धबधबे प्राधिकरणाने उपलब्ध करून दिलेल्या स्थळावरून पाहता येऊ शकतात आणि त्यांचा आनंद घेता येऊ शकतो. कुरुस्सदी घाट हा आंघोळ करण्यासाठी उत्तम ठिकाण आहे..
घनदाट जंगलांमध्ये असण्याबरोबरच, धबधब्यांच्या आजूबाजूचा परिसर अतिशय हिरवागार आहे. इथे झुडपांपासून सदाहरित असणारे विशाल अणि अतिशय उंच वृक्ष आणि थोडी कमी हिरवी असलेली तृणभूमि आढळते..
मानकयमहून, पर्यटक जवळच्या आकर्षक स्थळी आणि ट्रेकिंगसाठीहीजाऊ शकतात. इथल्या अंतर्गत भागाच्या ट्रेकमध्ये, इरुथला मूला-अयमपाराचा समावेश आहे जे अर्ध्या दिवसाचे ट्रेक आहे, ज्यात अयमपारा धबधबा आणि ह्या भागातले काही वन्यजीव पाहता येऊ शकतात. साहसप्रिय पर्यटक एक दिवसाच्या मानकयम-वरयादिनमोट्टी ट्रेकचा पर्याय स्विकारु शकतात. हे ट्रेक तुम्हाला वर खाली असणार्या दर्या खोर्यातून, गवताळ भूमितून आणि शोला जंगलांतून घेऊन जाते. इथे तुम्हाला जंगली बकरीची एक प्रजाती धोकादायक नीलगिरी टार वरयादिन मोट्टीच्या शिखरावर दिसू शकते. प्रशिक्षित गाईड्ससोबत कॅंपिंगचा पर्यायही येथे उपलब्ध आहे.
चौकशी आणि आरक्षणासाठी, संपर्क करा:
- विभागीय वन कार्यालय (डिस्ट्रिक्ट फॉरेस्ट ऑफिस), थिरुवनंतपुरम, दूरध्वनी: + 91 471 2320637
- डिस्ट्रिक्ट टुरिझम प्रमोशन कौन्सिल ऑफिस,थिरुवनंतपुरम दूरध्वनी: + 91 471 2315397
इथे जाण्यासाठी
- जवळचा विमानतळ: अंदाजे 55 किमी दूर असलेले थिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळ.
- जवळचे रेल्वे स्थानक: थिरुवनंतपुरम सेंट्रल, अंदाजे 45 किमी.