भारतातील केरळ येथील इडुक्की जिल्यातील रामाकलमेडू हे तेक्कडि पासून साधारणतः 40 किमी दूर अंतरावर स्थित असून हे केरळमधील अत्यंत सुप्रसिद्ध असे वन्यजीव स्थळ आहे. तेक्कडि – मुन्नार मार्गाद्वारे आपण पश्चिमी घाटावर असलेल्या रामाकलमेडूच्या मनोरम पर्वतशिखरांवर पोहोचू शकता. हे ठिकाण नेडुमकंडमपासून साधारण 16 किमी अंतरावर आहे.
या स्थानाचे नाव येथील पर्वत पठारावर पसरलेल्या पायाच्या ठशांमुळे मिळालेले आहे. पौराणिक ग्रंथ रामायणानुसार हे भगवान विष्णूचा अवतार असलेल्या रामाच्या पावलांचे ठसे आहेत.
रामाकलमेडु आपल्या हिरव्यागार, थंड टेकड्यांसाठी ओळखले जाते. येथून आमच्या शेजारी असलेल्या तामिळनाडू राज्याच्या गावांतील मनोरम दृश्ये पाहायला मिळतात, जी पश्चिमी घाटाच्या पूर्व किनार्यानस आहेत. येथील अजून एक आकर्षण असे आहे कि साधारण 300 मीटर ऊंच अस एक स्तंभाकार शिखरटोक असून ते पूर्वेकडे झुकलेले आहे.
आशिया खंडात असणार्या वेगवान वारे असणार्याू ठिकाणांपैकी हे एक ठिकाण आहे. यास्तव केरळ राज्य सरकारमार्फ़त संचालित अशा अनेक पवनचक्क्या येथे दिसून येतात.
रामाकलमेडूच्या आसपास असणार्यात अन्य आकर्षणांमध्ये फ़्रॉग रॉक, टर्टल रॉक तसेच सर्वात ऊंच ट्विन स्टॅच्यू (यालाच कुरवम आणि कुरथी या नावाने ओळखले जाते) यांचा समावेश होतो.
रामाकलमेडूच्या मार्गावर प्रवाशांना रबर, चहा, वेलची, कॉफ़ी, काळिमिरी यांचे मैलोनमैल लांब असे मळे आणि कुट्टिकानमच्या मनोरम पर्वतरांगांचा आनंद घेता येतो.
येथे पोहोचण्यासाठी:
- जवळचे रेल्वे स्थानक: चंगनचेरी, साधारण 93 किमी
- जवळचा विमानतळ: मदुराई (तामिळनाडू) साधारणतः 140 किमी, कोचिन आंतरराष्ट्रीय विमानतळ, नेदम्बसरी, साधारणतः 190 किमी.