स्थान: इडुक्की जिल्ह्यामधे, मुन्नारपासून सुमारे 70 कि.मी.
काटेरी झाडांसह, वाळवंटी वनस्पतींचे आश्रयस्थान असलेले चिन्नार अभयारण्य हे हे भारतातील नष्टप्राय होत असलेल्या करड्या रंगाच्या मोठ्या खारींचे वसतीस्थान आहे. इथे त्यांची एकूण संख्या 200 पेक्षा कमी आहे. केरळातील अन्य अभयारण्यांच्या विरुद्ध अशा पश्चिम घाटातील वृष्टी-छायेच्या प्रदेशात असल्यामुळे येथे वर्षातील केवळ २ महिनेच पाऊस पडतो. पशु-जीवनाच्या बाबतीत समृद्ध असणारी इथली पानझडी वने गिर्यारोहणासाठी अतिशय उपयुक्त आहेत.
चिन्नारच्या जवळच असणारे चंदनाचे वन हे एक अतिरिक्त आकर्षण ठरते. त्याचबरोबर हत्ती व रानगव्यांचे फिरणारे कळप बघण्यासाठी देखील हे एक आदर्श ठिकाण आहे. शुष्क पानझडी वृक्ष, उंच शोला वने, व काही गवताळ क्षेत्र यामुळे येथील विविधतेत भर पडते. करिमुथीहून चिन्नारला जाताना, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना, हत्ती, ठिपकेदार हरणे, सांबर, हनुमान वानरे, तसेच मोरदेखील दृष्टीस पडतात.
येथे पोहोचण्यासाठी:
- जवळील रेल्वे स्टेशन: एर्नाकुलम, मुन्नारपासून सुमारे 130 कि.मी.
- जवळचा विमानतळ: कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुन्नारपासून सुमारे 150 कि.मी.