Trade Media
     

कुमकोरम येथे जबाबदार पर्यटन

     
 

कुमरकम येथील जबाबदार पर्यटनाची सुरूवात डिसेंबर, 2007 मध्ये झाली; पण याचा प्रत्यक्ष शुभारंभ हा मार्च, 2008 मध्ये झाला. सर्व भागीदारांबरोबर चर्चा आणि एकदिवसीय कार्यशाळेपासून याचा आरंभ केला. जबाबदार पर्यटनाचे भविष्य आणि आवश्यकता लक्षात घेता, कुमरकम ग्राम पंचायत आपल्या अखत्यारीतील भूमिवर ही परियोजन चालविण्यास तयार झाली.यात स्थानिक स्वराज्य संस्था ह्या प्रमुख स्थानी असल्याने सुरवातीच्या काळात येणार्‍या सर्व समस्यांचे प्रभावीपणे निरूपण केले गेले आणि जबाबदार पर्यटनामध्ये प्रभावीपणे वाढ झाली.कुमरकम येथील द्वितीय वर्षाच्या   जबाबदार पर्यटनाला मोठी सफ़लता प्राप्त झाली.


a. महिला सशक्तीकरण

हे खरोखरच प्रशंसनीय आहे कि महिला जबाबदार पर्यटनामार्फ़त पैसे कमवण्याच्या संधींना समजू शकल्या. साधारण 900 महिलांनी उत्पादन प्रक्रियेमध्ये भाग घेऊन फ़ारच थोड्या कालावधीमध्ये पैसा उभा केला.


b. रोजगाराच्या संधी

जबाबदार पर्यटनाने कुमकोरमला धन प्राप्त करून देणार्‍या कार्यांचे प्रमुख स्थान बनविले.लघू उद्योगाद्वारे केले जाणारे उत्पादन तसेच पारम्पारिक कला आणि अन्य सांस्कृतिक उत्पादनांच्या विक्रीमार्फ़तयेथील स्थानिक रहिवाशांना उपजीविकेमध्ये पुष्कळ लाभ झाला. अशा प्रकारे जबाबदार पर्यटन हे स्थानिक लोकांना प्रत्यक्ष मालकाच्या रूपामध्ये पर्यटन व्यवसायात आर्थिक भागिदारी घडवण्यात जोर देते; केवळ दानाचे लाभार्थी या रूपात बघत नाही. कुमाकोरममधील लाभ केंद्रित उत्पादनामध्ये येथील स्थानिक स्वराज्य संस्थांनादेखील सफ़लता मिळाली आहे.

c. संघटित विकास
राज्य पर्यटन विभाग तसेच कुमरकम ग्राम पंचायत यांच्या सहयोगातून 15 हॉटेल्स तसेच रिसॉर्टस जबाबदार पर्यटनाच्या समूहामध्ये समाविष्ट झालेल्या आहेत.यांच्या संयुक्त प्रयत्नांमधून पारंपारिक उत्पादनांसाठी बाजाराची द्वारे खुली झाली आहेत. जबाबदार पर्यटनाचे एक नियमित केंद्र असल्याने लाभ कमविणार्‍या पर्यटन स्थळांपैकी कुमरकम हे त्या विभागातील प्रथम स्थान प्राप्त करते.


d. जबाबदार पर्यटन स्थल विभाग(गंतव्य कक्ष) आणि त्याची कार्यप्रणाली
जबाबदार पर्यटनाच्या सेवांना वृद्धिंगत करण्यासाठी तसेच याच्या सादरीकरणात वाढ करुन त्याला पुढच्या पायरीवर नेण्यासाठी सप्टेंबर, 2008 मध्ये जबाबदार पर्यटन डेस्टिनेशन सेल (गंतव्य कक्ष) स्थापन केला गेला.यात तांत्रिक,आर्थिक आणि सामाजिक पैलूंचा ताळमेळ राखत अधिकाधिक पर्यटन सुविधा पुरवीण्यात आल्या.हॉटेल आणि रिसॉर्ट सेवांमध्ये समकक्ष विक्रीलाभ मिळविणार्‍या समॄद्धी समूहाच्या व्यावसायिकतेमार्फ़त उत्पन्नामध्ये स्थिरत्व आले. हा समूह खुल्या बाजारपेठेत लोकांना योग्य व माफ़क दरात उत्पादने विकतो.


e. उत्पादन विभाग
विक्री प्रवाहातील अडथळ्यांवर मात करण्यासाठी कुडूम्बश्री विभाग हा शेतांमध्ये सुरू करण्यात आला आहे.रिकामी असलेली किंवा नापिक जमीन शेतीयोग्य जमिनीत बदलून भाज्यांच्या उत्पादनात भरपूर सफ़लता मिळाली आहे आणि यामुळे विक्रीचा आलेखदेखील उंचावला आहे. उत्पादनामधील मृदेचा स्तर वाढविण्यासाठी कुमरकमने 9 कर्षक समित्या स्थापन केल्या आहेत आणि एक समिती जवळच असलेल्या मंजदिकरे येथे आहे.कुडूम्बश्रीचे लघू-उद्योग विभागांबरोबरच 250 सदस्य, तसेच 512 परिवारांबरोबर घरगुती शेती तसेच  450 कर्षक समित्या आणि त्यांचे सदस्य या सर्वांमार्फ़त कुमरकम जबाबदार पर्यटनाच्या उत्पादनासाठी आणि विक्री बाजारासाठी संचालन करत आहे.


f. मागणी आणि पुरवठा
हॉटेल आणि रिसॉर्टस बरोबर गावकर्‍यांचा भाज्या, फ़ळे, अंडी, मांस, तसेच दूध खरेदी करण्याबाबत करार केला गेला. कुडूम्बश्री विभागाद्वारा गुणवत्तापूर्ण वस्तूंचा नियमित पुरवठा करण्याची विषेश व्यवस्था केली गेली. लीजवर घेतलेल्या जमिनीवर शेतीचा (कुडूम्बश्री किंवा हरितश्री) लाभ होत आहे. मूल्य समितीने (DLRTC याचे संघटन केले आहे.ज्यामध्ये यांचा समावेश होतो – ग्राम पंचायत, कुडूम्बश्री, DTPC, हॉटेल्सचे खरेदी व्यवहार पाहणारे अधिकारी), गुणवत्ता समिती (DLRTC – ने याचे संघटन केले आहे, ज्यात ग्राम पंचायत, कुडूम्बश्री, DTPC हॉटेलचे शेफ़, पशु चिकित्सक, कृषि अधिकारी तसेच आरोग्य तपासणारे अधिकारी यांचा समावेश होतो) हे सर्व उत्पादनांचे मूल्यांकन करतात.


g. आर्थिक सफ़लतेची रूपरेषा
जबाबदार पर्यटन डेस्टिनेशन सेल आणि कुमकोरम ग्राम पंचायतीने गेल्यावर्षी उत्पादन- विक्री आणि लाभ यांचा आलेख सांभाळला होता. समृद्धी समूहाने विक्री उत्पन्नामध्ये रूपये 12,12,211,70 खुल्या बाजारपेठेतील उत्पनात 2,55,361,60 रूपयांची वाढ केली.इतर सफ़ल जबाबदार पर्यटन उपक्रमामुळे कुमरकमला 2,28,000 रूपयांची प्राप्ती झाली.यापैकी  80% उत्पन्नाचे वितरण पुन्हा नव्या परियोजनांमध्येच केले गेले.


h. उत्तमरित्या संघटित आणि व्यावसायिक कार्यांनी कुमकरमच्या जबाबदार पर्यटनाला सफ़लता मिळवून दिली आणि त्याला आर्थिक स्थैर्य प्राप्त करुन दिले.
जबाबदार पर्यटन कार्यक्रमाने नविन पर्यटन अनुभवांचा विकास केला,ज्यात सामाजिक तसेच आर्थिक रूपाने सकारात्मक ’होस्ट-गेस्ट’(यजमान-पाहूणे)  संबंधांचा विस्तार घडून आला. अशाप्रकारे आरटीने नकारात्मक आर्थिक, पर्यावरणीय आणि सामाजिक प्रभाव कमी केले त्याचबरोबर स्थानिक लोकांसाठी अधिक आर्थिक लाभ निर्माण केला याशिवाय स्थानिक- यजमान समूहांच्या प्रगतीमध्ये वाढ केली, त्यांच्या कामाच्या पद्धती व नियमांमध्ये सुधारणा केली आणि त्यांना या उद्योगापर्यंत आणले. 
 

i. प्राप्त उत्पन

  • मे  2009 पर्यंत समॄद्धी समूहाचा एकूण व्यवसाय होता:- रू. 11,85,000/-
  • अन्य लघू उपक्रमांमार्फ़त मे 2009पर्यंतचे एकूण उत्पन्न (प्रत्यक्ष पुरवठा):- रू. 2,05,000/-
 
     


 

Photos
Photos
information
Souvenirs
 
     
Department of Tourism, Government of Kerala,
Park View, Thiruvananthapuram, Kerala, India - 695 033
Phone: +91-471-2321132 Fax: +91-471-2322279.

Tourist Information toll free No:1-800-425-4747
Tourist Alert Service No:9846300100
Email: info@keralatourism.org

All rights reserved © Kerala Tourism 1998. Copyright Terms of Use
Designed by Stark Communications, Hari & Das Design.
Developed & Maintained by Invis Multimedia