कोझिकोड, हा पूर्वी मलबारमधील सर्वात महत्त्वाचा प्रदेश होता आणि शक्तिशाली जोमोरिनांची राजधानी होती तसेच हे एक महत्त्वाचे व्यापारी आणि बाजारपेठेचे केंद्र होते. काप्पाड येथेच वास्को द गामा पूर्वेकडील मसाल्यांच्या शोधात उतरला होता. आज शांत किनारे, हिरवीगार खेडी, ऐतिहासिक स्थाने यांच्यामुळे हे पर्यटकांचे आकर्षण बनले आहे.
कोझिकोड बीच हे सूर्यास्त दर्शनाची आवड असणाऱ्यांचे आवडते ठिकाण आहे. येथील नैसर्गिक सौंदर्य आणि जुनी ठिकाणे याला एक सुंदर पर्यटनस्थळ बनवतात. बीचवर जुने लाईटहाऊस असून समुद्रात वाकलेले दोन 100 वर्षे जुने खांब आहेत. मुलांना लायन्स पार्क आणि मरीन वॉटर एक्वेरियममध्ये मजा येईल. तुम्ही बीचपासून स्वतःला दूर करू शकलात तर कालिकत किंवा कोझिकोडचे शहर तुमचे स्वागत अनोख्या सांस्कृतिक व अन्य नजराण्यांनी करेल.
येथे पोहोचण्यासाठी:
- जवळचे रेल्वे स्थानक:कोझिकोड, साधारण 1 किमी
- जवळचा विमानतळ: करिपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ,साधारण 25 किमी.