स्थान: बेक्कल किल्ल्यापासून अंदाजे एक किलोमीटर, राष्ट्रीय महामार्गावरील कासरगोडच्या दक्षिणेला अंदाजे 16 किमी, कासरगोड जिल्हा, उत्तर केरळ
केरळचा सगळ्यात उत्तरेकडील जिल्हा कासरगोड देव, किल्ले, नद्या, डोंगर आणि सुंदर समुद्रकिनार्यांतची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे. बेक्कलचा भव्य किल्ला हा केरळमधील सगळ्यात मोठ्या आणि उत्तम जतन केलेल्ल्या किल्ल्यांपैकी एक आहे. बेक्कल किल्ल्याजवळ असलेल्या उथळ समुद्रकिनार्याकचा सुंदर विस्तार जो बेक्कल फोर्ट समुद्र किनारा म्हणून ओळखला जातो तो बेक्कल रिसॉर्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमार्फत (बीआरडीसी) आकर्षक समुद्रकिनार्यािचे स्थान म्हणून विकसित करण्यात आला आहे.
सौंदर्यीकरण: स्थळाच्या सौंदर्यीकरणात समावेश आहे समुद्र किनार्याूवर ग्रॅनाईटपासून बनविलेल्या थेय्यमच्या दोन मूर्त्या आणि एक शेड ज्याच्या भिंती निलम्बुरच्या कारागिरांनी बनविलेल्या भित्तिचित्रांनी सजविलेल्या आहेत. ह्याशिवाय पार्किंग क्षेत्रात एक रॉक गार्डन विकसित करण्यात आले आहे जेथे विविध आकाराच्या लॅटराईट दगडांचा वापर केलेला आहे. सामाजिक वनीकरण योजनेअंतर्गत, समुद्र किनार्यादच्या परिसरात झाडे लावण्यात आलेली आहेत.
पार्किंग सुविधा: बीआरडीसीने वेगवेगळ्या प्रकारच्या वाहनांच्या पार्किंगसाठी अंदाजे 7000 चौ.मी. ची जमीन विकसित केली आहे.
वॉकवे: पर्यटकांना सागर किनारपट्टीचे सौंदर्य अनुभवता यावे आणि बेक्कल किल्ल्याच्या विशाल दृश्याची मजा लुटता यावी यासाठी एक सुंदर वॉकवे तयार करण्यात आलेला आहे.
प्रकाश व्यवस्था असलेला समुद्र किनारा: संध्याकाळच्या वेळी समुद्र किनार्यापवर प्रकाश व्यवस्था करण्यात आलेली आहे ज्यामुळे सूर्यास्तानंतरही पर्यटक समुद्र किनार्याकवर जास्त वेळ थांबू शकतात.
विश्रामाची सोय: मल्टी शेड आणि एरु मडम पर्यटकांना विश्रांती घेण्यासाठी आणि किनार्यारवरच्या हवेची मजा लुटण्यासाठी पुरेशा सोयी उपलब्ध करून देतात. स्थानिकरित्या उपलब्ध असलेल्या साधनांचा वापर करून पर्यटकांना समुद्र किनार्याावर बसण्याची व्यवस्था पुरवीण्यात आलेली आहे.
शौचालये: पर्यटकांसाठी शौचालयांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे आणि परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी संपूर्ण किनार्यालवर ठिकठिकाणी पर्यावरण स्नेही असणार्यार बांबू पासून बनलेले कचर्यााचे डबे ठेवण्यात आलेले आहेत.
मुलांची बाग: 14 वर्षे वयाखालील मुलांसाठी येथे पार्क विकसित करण्यात आले आहे.
विकसित स्थळाच्या देखरेखीसाठी प्रवेश शुल्क म्हणून प्रत्येक पर्यटकाकडून केवळ एक रुपया आकारला जातो. ह्याच प्रकारे एक किरकोळ शुल्क वाहनाच्या पार्किंगसाठी गोळा केले जाते. भविष्यात समुद्र किनार्याकवर वॉटर पार्क, थीम पार्क इत्यादी बांधण्यासाठी आणखी 11 एकर जमीन विकसित करण्याचे बीआरडीसीचे लक्ष्य आहे.
बेक्कलला एक नियोजित पर्यावरण-स्नेही स्थळ बनविण्यासाठी केरळ सरकारने बीआरडीसीची स्थापना केली होती. बीआरडीसीने बेक्कल फोर्ट समुद्र किनार्या चा विकास करण्यासाठी 19 एकर जमिनीचा वापर केला ज्याचा खर्च भूमी अधिग्रहण शुल्कासमवेत अंदाजे रु.25 दशलक्ष एवढा आहे.
येथे पोहोचण्यासाठी :
- जवळचे रेल्वे स्थानक: कासरगोड, कोझिकोड-मैंगलोर-मुंबई मार्गावर.
- जवळचा विमानतळ: मँगलोर, कासरगोड शरापासून अंदाजे 50 किमी; कारीपुर आंतरराष्ट्रीय विमानतळ, कोझिकोड, कासरगोड शहरापासून अंदाजे 200 किमी.