थिरुवनंतपुरम शहरापासून फक्त 7 किमी असणारा शंखमुगम समुद्र किनारा हे सूर्यास्त पहाण्यासाठी येणार्या लोकांचे आवडते स्थळ आहे. हा समुद्र किनारा थिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि वेली पर्यटन गावाला लागूनच आहे.
इनडोअर मनोरंजन क्लब, मत्स्यकन्या (भव्य 35 मी लांब जलपरीची मूर्ती) आणि तारामाश्याच्या आकाराचे उपाहारगृह ही शंखमुगम समुद्रकिनार्याची काही आकर्षणे आहेत.
येथे पोहोचण्यासाठी
- जवळचे रेल्वे स्थानक: थिरुवनंतपुरम सेंट्रल, अंदाजे 7 किमी
- जवळचा विमानतळ: थिरुवनंतपुरम विमानतळ, मोटारीने काही अंतरावर.