स्थान: उत्तर केरळमधील, कन्नूर जिल्ह्यातल्या कन्नूर शहरापासून 2 किमी
शांत, एकांत, वाळूचा हा सुंदर विस्तार आणि लाटांची खळाळी असे हे संध्याकाळच्या आरामासाठी उत्तम स्थान आहे. पय्यमबलम समुद्र किनारा हे स्थानिक लोकांचे आवडते सहलीचे ठिकाण आहे आणि पर्यटक रिझॉर्ट म्हणून विकसित होण्याची ह्यात पूर्ण क्षमता आहे.
उर्वरित भाग-कन्नूर-हे सुद्धा एक आकर्षक स्थळ आहे. थेय्यम आणि लोक नृत्यासारख्या लोककलांमुळे कन्नूर कायमच एक चिरतरुण सौंदर्य असलेले स्थान राहिले आहे.
मात्र, जर तुम्ही ह्या किनाऱ्याच्या स्थळी लपून राहू इच्छित असाल, तर तुमच्या निवासाची सोय शहरात 2 किमी लांब केली गेली पाहिजे. रहाण्याची उत्तम सोय उपलब्ध आहे.
येथे पोहोचण्यासाठी:
राष्ट्रीय महामार्ग 17 कन्नूरमधून जातो.
- जवळचे रेल्वे स्थानक: कन्नूर, अंदाजे 2 किमी
- जवळचा विमानतळ: कारिपुर आंतरराष्ट्रीय विमानतळ, कोझिकोड, दक्षिणेला 93 किमी.