स्थान: उत्तर केरळमधील कन्नूर जिल्ह्यातल्या कन्नूर शहरापासून वलपट्टनम अंदाजे 7 किमी
आकर्षण: दक्षिण पूर्व आशायातील सगळ्यात मोठा लाकूड उद्योग, सुंदर मासेमारी हार्बर इ.
कन्नूर प्रसिद्ध मालाबार समुद्रकिनार्याचा तो भाग आहे जिथे “टेंपल ऑफ द लॉर्ड” बांधण्यासाठी इमारती लाकूड गोळा करण्याकरिता आणि मौल्यवान मसाले मिळविण्यासाठी सोलोमन होते. वलपट्टनम नदीच्या किनार्यावर लहान खेड्यांमध्ये आधुनिक काळातला एक मोठा टिंबर उद्योग स्थापन करण्यात आलेला आहे, ज्याचे नाव आहे वेस्टर्न इंडिया प्लायवुड लि., हा दक्षिण पूर्व आशियातला सगळ्यात मोठा लाकूड उद्योग आहे.
वलपट्टनमचा टिंबर उद्योग ह्या जिल्ह्याच्या समृद्ध वन संपत्तीवर आधारलेला आहे. इथल्या जंगलांमध्ये टीक, इरुली, करिमुरुक्कू, चंदन (सॅंडलम ऐलबम) इत्यादी पुष्कळ प्रमाणात सापडतात. ह्याशिवाय चहा, कॉफी, रबर, तंबाखू, काजू इत्यादी नगदी पीकेसुद्धा सापडतात. कन्नूर हे केरळमधील एकमेव ठिकाण आहे जिथे पुकैला (तंबाखू) ची लागवड यशस्वीपणे केली जाते.
वलपट्टनम एक प्रसिद्ध मासेमारी हार्बरसुद्धा आहे तसेच जिल्ह्यातल्या जलसिंचन प्रकल्पाचा मुख्य स्त्रोत आहे. इमारतीचे लाकूड वाहून नेण्याची पारंपरिक पद्धत पहाणे हा एक चित्तवेधक अनुभव आहे, ज्यात इमारतीच्या लाकडाचे मोठे तुकडे एकत्र बांधले जातात आणि पाण्यावर तरंगू देऊन खेचले जातात.
येथे पोहोचण्यासाठी:
- जवळचे रेल्वे स्थानक: कन्नूर, वलपट्टनमपासून अंदाजे 7 किमी
- जवळची विमानतळे: कारीपुर आंतरराष्ट्रीय विमानतळ, कोझिकोड, कन्नूर शहरापासून अंदाजे 93 किमी.