कोल्लमच्या जिल्हा पर्यटन प्रोत्साहन परिषद (डीटीपीसी) शी संपर्क करा आणि कोल्लम् मधील शांत अष्टमुडी बॅकवॉटर स्ट्रेचचा आनंद घेताना त्यांना तुमचे मार्गदर्शक बनू द्या.
डीटीपीसी कोल्लमने दिलेल्या 3 मजेदार हाऊस बोट क्रूजची माहिती घेऊया.
मनमोहक ब्लू वॉटर क्रूज:
पॅकेजमध्ये तीन पर्याय आहेत जसे 1. राउन्ड द ट्रिप क्रूज 2. सी एन्ड स्लीप क्रूज 3. स्टार नाईट क्रूज.
’राउन्ड द ट्रिप क्रूज’ चा पर्याय निवडल्यास, अष्टमुडी बॅकवॉटरची सगळी बेटे एका पूर्ण दिवसाच्या क्रूजमध्ये पूर्ण होतील आणि आणि ’ सी एन्ड स्लीप क्रूज’ पर्याय निवडल्यास दिवसभराची क्रूज सफर आणि रात्री बॅकवॉटरवर राहणे ही सुविधा दिली जाते. तिसरा पर्याय ’स्टार नाईट क्रूज’ हा पर्याय मनोहर सूर्यास्त आणि बॅकवॉटरवर रात्र या सुविधा देते.
हाऊस बोट क्रूज आणि रिसॉर्टवर राहणे:
कोल्लम् डीटीपीसीच्या या पॅकेजमध्ये एक पूर्ण दिवसाची हाऊस बोट क्रूज आणि प्रतिष्ठित बॅकवॉटर रिसॉर्टमध्ये राहणे याचा समावेश असतो. उपलब्ध पर्याय आहेत : 1. मॅजेस्टिक क्रूज आणि रिसॉर्ट स्टे 2. एलिगन्ट क्रूज आणि रिसॉर्ट स्टे आणि 3. सेरीन आणि रिसॉर्ट स्टे
'मॅजेस्टिक क्रूज आणि रिसॉर्ट स्टे’ मध्ये हाऊस बोट क्रूज सकाळपासून सुरू होते आणि संध्याकाळपर्यंत अष्टमुडीला पोहोचते. रिसॉर्टवरील सुविधांमध्ये अंतर्भूत आहे, एसी सूट रूम आणि मल्टिकुझीन जेवण. दुसऱ्या दिवशी सकाळी क्रूज निघून कोल्लमच्या प्रारंभ बिंदूपर्यंत येईल.
एलिगन्ट क्रूज आणि रिसॉर्ट स्टे' मध्ये हाऊस बोट क्रूज सकाळपासून सुरू होते आणि संध्याकाळपर्यंत पाम लगून बॅकवॉटर रिसॉर्टला पोहोचते. येथे, नैसर्गिक वातावरणात आराम करता येतो आणि विशेष माशांच्या पदार्थांचा आस्वाद घेता येतो. दुसऱ्या दिवशी सकाळी क्रूज निघून प्रारंभबिंदूपर्यंत येते.
’सेरीन आणि रिसॉर्ट स्टे' या तिसऱ्या विकल्पात, हाऊस बोट क्रूज सकाळपासून सुरू होते आणि एक्वासिरीन बॅकवॉटर रिसॉर्टपर्यंत पोहोचते. क्रूज रिसॉर्टवर संध्याकाळी पोहोचते आणि चेक-इन केल्यावर विविध खाद्यपदार्थांचा आनंद घेता येतो. दुसऱ्या दिवशी सकाळी क्रूज निघून प्रारंभ बिंदूपर्यंत येते.
हाऊस बोट क्रूज आणि कथकली नृत्यप्रदर्शन:
डीटीपीसी कोल्लमचे हे आणखी एक आकर्षक पॅकेज आहे, ज्यात पूर्ण दिवस हाऊस बोट क्रूजवर आणि संध्याकाळी कथकली नृत्यप्रदर्शन आणि हाऊस बोटवर रात्री राहणे अंतर्भूत असते. ही क्रूज दुपारनंतर सुरू होते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी प्रारंभ बिंदूपर्यंत येते.
वरील हाऊस बोट क्रूज पॅकेजेससाठी, डीटीपीसी कोल्लमशी संपर्क करा, सध्याच्या शुल्क आणि क्रूज तपशीलासाठी संपर्क साधा:
पत्ता:
डीटीपीसी पर्यटन कार्यालय
गेस्ट हाऊस कॉम्प्लेक्स
आश्रमम
कोल्लम्
दूरध्वनी: + 91 474 2750170.
ईमेल: alp_dtpcalpy@sancharnet.in
Department of Tourism, Government of Kerala, Park View, Thiruvananthapuram, Kerala, India - 695 033
Phone: +91-471-2321132 Fax: +91-471-2322279.
Tourist Information toll free No:1-800-425-4747
Tourist Alert Service No:9846300100
Email: info@keralatourism.org