तुम्हाला सुंदर दृश्य आणि पाण्याचा आवाजात काही वेळ काढायचा असेल तर, या कंट्री बोटमध्ये बसा आणि अलप्पुझाच्या कालव्यांच्या भुलभुलैयात हरवून जा. या कालव्यांमधून विहार करताना, दैनंदिन जीवनातील अनेक मजेदार अनुभव तुम्हाला पाण्यात आणि काठावरही येतील.
अलप्पुझामध्ये, तुम्हाला तुमच्या गरजेनुसार बोटी मिळतील, यात लहान कंट्रीबोट्सपासून आरमादायक हाऊस बोटपर्यंत आणि लहान स्पीड बोटपासून मोठ्या पॅसेंजर मोटरबोटपर्यंत. कालव्यांमधून फिरण्यासाठी लहान बोटी चांगल्या. एकदा परिवहनाचे साधन ठरवा आणि मग अलप्पुझामधील आणि भोवतालच्या कालव्यांची सैर करा.
कालव्यांचे जाळे वेम्बन्नाडू तलावाच्या कोणत्याही भागात असले तरी, कालव्यांच्या काठावर मनोहर दृश्ये नक्कीच दिसतील. पसरलेली भातशेती, नारळ काठावर असलेल्या खाजणी, पाण्यात सूर मारणारे खंड्या पक्षी इ. क्रूजमधून दिसणाऱ्या दृश्यांपैकी सामान्य दृश्ये आहेत, एकाकी बेटे, कंट्री बोटींवरून मासेमारी करणारे, बदकांना नवीन जागी नेणारे कोळी, केट्टू वल्लम किंवा राईस बर्जेस या मोठ्या बोटींमध्ये नेले जाणारे सामान आणि कालव्यांमधून फेरीबोटीने नेली जाणारी मुले.
क्रूजदरम्यान, काथ्याच्या वस्तू बनविण्याचे तंत्रज्ञान पाहण्यासाठी एखाद्या गावात उतरू शकता. शिवाय, तुम्हाला रस्त्यावरील हॉटेल्समधून पारंपारिक जेवण मिळेल, खासकरून माशांचे पदार्थ, तसेच नारळाच्या झाडापासून बनणारी ताडी.
तर मग तयार व्हा, अलप्पुझाच्या कालव्यामंधून सफर करण्यासाठी. कारण ही कदाचित केरळच्या कालवे आणि बॅकवॉटरमधील सफरींची केवळ सुरुवात असेल. केएसआरटीसी बस स्थानकाजवळील जेट्टीवरून बोट भाड्याने घेता येते.
येथे पोहोचण्यासाठी:
- जवळचे रेल्वे स्थानक: अलप्पुझा, काही किलोमीटर दूर.
- जवळचा विमानतळ: कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ, नेदुंबसरी, 85 किमी.