|
|
|
|
|
|
|
|
|
|
पापनाशम समुद्र किनारा |
|
|
वाळुचा रुपेरी विस्तार आणि समुद्र किनार्यावरचे शांत वातावरण ही वर्कलाची पर्यटन स्थळ म्हणून असलेली ठळक वैशिष्ट्ये आहेत. ‘पापनाशम’ हे इथल्या महत्वपूर्ण समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे आणि हे एक महत्वाचे पर्यटन स्थळ आहे इतकेच नाही तर त्याला धार्मिक संदर्भही आहे. असे मानले जाते कि इथल्या पाण्यात डुंबल्याने माणसाची सगळी पापे धुतली जातात आणि म्हणूनच समुद्रकिनार्याला हे नाव पडले आहे. हिंदूंसाठी हे एक अतिशय पवित्र स्थान आहे आणि अंत्यसंस्कार स्थळावरील राखेचे इथल्या समुद्रात विसर्जन केले जाते. ते असे मानतात की ह्यामुळे मृत व्यक्तीची सगळी पापे धुतली जातात आणि त्याच्या आत्म्याला शांती मिळते.
समुद्र किनार्यावरचे वातावरण
पांढर्या वाळूच्या किनार्यालगतच गुलाबी लॅटराईट क्लिफ्स आहेत, जे तेथे समुद्राचे रक्षण करणार्या पहारेकर्यांसारखे उभे रहातात. क्लिफ्सनी किनार्याला वेढले आहे आणि ज्यांना शहरी जीवनाच्या कोलाहलापासून दूर रहायचे आहे त्यांच्यासाठी हे योग्य ठिकाण आहे. किनार्यावरील नारळाची झाडे आणि इथली शांतता यामुळे इथे अतिशय मंत्रमुग्ध करणारे वातावरण असते आणि हे नेहमीच पर्यटकांना समाधान आणि नवीन ऊर्जा देणारे स्थळ आहे. तुम्ही समुद्रातले शिंपले गोळा करु शकता; वाळूत फिरायला जाऊन निळ्या पाण्याचा अनंत विस्तार पाहू शकता किंवा किनार्याचे चुंबन घेणार्या उन्हाचा वाळूवर पडून आनंद घेऊ शकता. सनबाथसाठी हे एक आदर्श ठिकाण आहे किंवा सूर्यास्ताचे योग्य दृश्य आहे. सूर्यास्तानंतर आकाशात दिसणारे सोनेरी केशरी रंग पाहून तुम्हाला नक्कीच सगळ्यात मोठा चित्रकार म्हणजेच ह्या निसर्गापुढे नतमस्तक व्हावेसे वाटेल. समुद्राच्या सोनेरी पिवळ्या पार्श्वभूमीवर क्षितीजावर तयार होणारी मासे पकडणार्या होड्यांची आकृती तुमच्यातल्या चित्रकाराला जागे करेल.
क्लिफ्स-वैशिष्ट्ये
वर्कला हे दक्षिण केरळमधील असे एकमेव ठिकाण आहे जेथे क्लिफ्स समुद्राचे रक्षण करतात. भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते, ही टर्शियरी सेंडिमेंटरी क्लिफ्सची निर्मिती विशिष्ट भूगर्भशास्त्रीय लक्षण आहे. हे एक भूगर्भशास्त्रीय स्मारक आहे ज्याला भूगर्भशास्त्रज्ञ ‘वर्कला निर्मिती’ असे म्हणतात. लॅटराईट क्लिफ्समधून पडणार्या नैसर्गिक झर्यात औषधी गुणवत्ता आहे असे मानले जाते, कारण त्यात पुष्कळ खनिजे आहेत. ह्याच्या औषधी गुणांमुळे असंख्य पर्यटक इथे येतात आणि वेगवेगळे आजार बरे करण्यासाठी इथल्या पाण्यात डुंबतात.
क्लिफ विस्तारलेला आहे आणि त्याला वर गोलाकार पदपथ आहे जो तुम्हाला हॉटेल, दुकाने इ. जवळ नेतो, आणि टोकावर असलेल्या पठारावरून तुम्ही सभोवतालचे विशाल दृश्य पाहू शकता.
डोंगराच्या टोकावर चढा आणि तुम्हाला गावातल्या उत्सवात सहभागी झाल्यासारखे वाटेल. कित्येक दुकाने जी पलंग, तिबेटी कलेच्या वस्तू, पुस्तके, राजस्थानी कपडे आणि दुर्मिळ कलाकृती विकतात, ती तुम्हाला येथे पहायला मिळतील. तुम्ही येथे तुमच्या शरीरावर टॅटू काढून घेऊ शकता किंवा समुद्राचे दृश्य पहात स्वादिष्ट जेवणाची मजा लुटू शकता. तुम्ही बांबूच्या गावालाही भेट देऊ शक्ता किंवा क्लिफच्या कोपर्यावर उभे राहून आजूबाजूच्या शांत वातावरणाचा आनंद घेऊ शकता.
साहसी खेळ आणि खरेदी
जर तुम्ही साहसात रस असणारे पर्यटक असाल, तर समुद्र किनार्यावर त्यासाठीदेखील वाव आहे. तुम्ही पॅरासेलिंग, स्कूबा डायव्हिंग आणि पॅराग्लाइडिंगसारख्या अनेक साहसी खेळांमध्ये सहभागी होऊ शकता. तुम्ही खोल समुद्रात मासे पकडण्याचा प्रयन्त करू शकता किंवा समुद्र किनार्यावर असलेल्या दुकानांमध्ये खरेदी करुन सुंदर स्मृतिचिन्हे किंवा दुर्मिळ कलाकृती गोळा करु शकता. इथल्या उपाहारगृहात तुम्हाला अनेक सी फूडमधील पदार्थ मिळतील जे निश्चितच आपल्या चवीने तुम्हाला आनंद देतील.
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|