समुद्रसपाटीपासून 1600 मीटर वर असलेले हे हिल स्टेशन पूर्वी इंग्रज सरकारचे दक्षिण भारतातील उन्हाळी रिसॉर्ट होते. विस्तीर्ण चहाचे मळे, चित्राप्रमाणे गावे, वळणावळणाचे रस्ते आणि सुट्टीतील सर्व सोयी-सुविधा यांमुळे हे एक प्रसिद्ध रिसॉर्ट ठिकाण बनले आहे. येथील जंगल आणि गवताळ पठारांवर मिळणाऱ्या वनस्पतींपैकी एक प्रमुख आहे, नीलकुरिंजी. हे फूल बारा वर्षांत एकदा फुलते आणि संपूर्ण डोंगराला निळ्या रंगात रंगविते. आता हे फूल 2018 मध्ये बहरेल. मुन्नारमध्ये दक्षिण भारतातील सर्वात उंच शिखर आहे, आनामुडी, जे 2695 मीटर उंच आहे. आनामुडी गिर्यारोहणासाठी उत्तम आहे.
Department of Tourism, Government of Kerala, Park View, Thiruvananthapuram, Kerala, India - 695 033
Phone: +91-471-2321132 Fax: +91-471-2322279.
Tourist Information toll free No:1-800-425-4747
Tourist Alert Service No:9846300100
Email: info@keralatourism.org