Trade Media
     

अलप्पुझा – कोची क्रूझ


देवाच्या या प्रदेशात पायी फिरून दमलात का? दमला असाल तर थोडे काही तरी वेगळे आणि आरामदायक करूया. बॅकवॉटर क्रूझ कसे वाटते? आरामदायी हाऊस बोटमध्ये आराम करणे? तुम्ही अलप्पुझावरून एक हाऊस बोट भाड्याने घेऊ शकता. वेम्बन्नाडू तलावातील केरळच्या सर्वात मोठ्या बॅकवॉटरचा आनंद निश्चिंतपणे आणि आरामात घ्या.

आता कुमरकम पाहूया, जे आहे केरळमध्ये येणाऱ्या पर्यटकांचे एक मुख्य आकर्षण. वेम्बन्नाडू तलावाच्या रस्त्यावर असलेले हे ठिकाण बॅकवॉटर ग्रामीण जीवनाचे दर्शन घडवते आणि अनेक बॅकवॉटर कार्यक्रमही देते. चैतन्याने सळसळणारे आणि शुद्ध सौंदर्याने बहरलेले हिरवेगार किनारे तुम्हाला कधीच थकवा येऊ देणार नाहीत. आल्हाददायक सूर्यप्रकाश पाण्याला एक नवी झळाळी देतात आणि दोन्ही किनाऱ्यांवरची ताडाची झाडं वाऱ्याशी कुजबुजत तुमचे स्वागत करतात. तुमचे मन तुम्हाला सांगत असते की हे दृश्य तुमच्या सर्वात लगबगीच्या दिवसांमध्येही तुमच्या मनात जपून ठेवले जाईल.     

तुम्ही एकदा कायलच्या क्यू, एस, टी, आर या ब्लॉक्समध्ये गेलात की, तिथं दृश्य अधिकच मनोहर होते. हे कुट्टनाड येथे असून याला केरळची भाताची मूद असे म्हणतात. पाम झाडांची सळसळ आणि भातशेतीने वेढलेल्या कालव्यांमध्ये क्रूजने सफर करा.  

कुमरकमला पोहोचल्यावर तुम्ही एका आश्चर्यांच्या वेगळ्याच दुनियेत पोहोचता. बेटांचा समूह असलेल्या या लहान बॅकवॉटर गावाचे स्वतःचे असे संथ आणि मंद लयीचे जीवन आहे. दृश्य, ध्वनी आणि गंध तुम्हाला मंत्रमुग्ध करतील. 

कुमरकम येथे थोडा वेळ थांबल्यावर, तुम्ही थोड्या आरामासाठी वायकोमला जाऊ शकतात. पुन्हा एकदा वेम्बन्नाडू तलावाच्या शांततेचा आणि संपूर्ण सौंदर्याचा आस्वाद घेण्याची वेळ आली आहे. याच रस्त्यावर तुम्हाला बॅकवॉटरच्या मध्येच जणु तरंगणारं एक लहान बेट लागेल पतिरमनल. येथे थोडे थांबा, गाईड तुम्हाला या ठिकाणाभोवती गुंफल्या गेलेल्या दंतकथा ऐकवेल. 

प्रवास पुन्हा सुरू केल्यावर तुमचा पुढचा मुक्काम आहे, तन्नीरमुक्कोम, असे गाव जे आपल्या सॉल्ट वॉटर बॅरियरसाठी प्रसिद्ध आहे, ज्याला म्हणतात, तन्नीरमुक्कोम बंड म्हणतात. हे भारतातील सर्वात मोठे चिखल नियंत्रक (मड रेग्युलेटर) आहे. या प्रदेशातून भटकणे आणि काही चविष्ट केरळी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेणे हा एक सुंदर अनुभव असतो. 

तुमचे पुढचे बॅकवॉटर ठिकाण – वायकोम तुम्हाला सुंदर दृश्ये आणि जीवनशैली दाखवतो. केरळच्या श्रेष्ठ परंपरेचा नमुना तुम्हाला येथे पहायला मिळतो. या शहरातील मुख्य आकर्षण म्हणजे शंकराचे प्रसिद्ध मंदीर. आणखी एक आकर्षण म्हणजे येथील तजेलदार हिरवळ.  

वायकोमला स्वादिष्ट केरळी जेवणाचा आस्वाद घेऊन तुम्ही कुंभलंगीला निघता. तुम्ही प्रवास करता तिक्कटुसेरी या गावातून जे बॅकवॉटर जीवनाचे मनोहर अंग अशा पाम आणि भातशेतीने मढलेले आहे. कुंभलंगीला तुमचे स्वागत करणारी पहिली गोष्ट म्हणजे, बॅकवॉटरच्या कडेने लावलेली मोठीमोठी चायनीज जाळी. पोक्कली कृषी, एक पारंपारिक कृषी पद्धती ज्यात भात शेती काढल्यानंतर पाण्यातून कोलंबी चाळून काढली जाते, ही कुंभलंगीमधली एक अनोखी कृषी पद्धती आहे.

कुंभलंगीच्या वाऱ्याच्या झुळुकांचा आस्वाद घेतल्यानंतर,आता आपल्यला कोची किल्ल्यावर जायचे आहे जो चायनीज मासेमारी नेट्स आणि ऐतिहासिक स्थानांसाठी प्रसिद्ध आहे. येथे तुम्ही चालत फिरू शकता. मात्र, बोटीवरून दिसणारे दृश्यही सुंदर असते.           
      
कोची किल्ल्याचा निरोप घेऊन, बोलघट्टी बेटाकडे जाऊया जे आपले शेवटचे ठिकाण आहे. बोलघट्टी बेटाच्या मार्गावर तुम्हाला लागेल एर्नाकुलम शहराचे, क्षितिजाचे आणि पूर्वेकडे गोदीचे दृश्य दिसेल. बोलघट्टीला पोहोचल्यावर आराम करायची वेळ असते. थंड हवेचा आणि उबदार सूर्यप्रकाशाचा आनंद घ्या.

या शेवटच्या काही तासांच्या आठवणी तुम्हाला पुढची अनेक वर्षे पुरतील. पटत नाही? मग या ट्रिपचा नक्की अनुभव घ्या आणि तुम्हाला नक्की पटेल.

अलप्पुझामध्ये मार्गदर्शित टूर्स आणि बॅकवॉटर क्रूजसाठी संपर्क करा:
  • जिल्हा पर्यटन प्रोत्साहन परिषद (डीटीपीसी).
  • फोन: + 91 477 2253308, 2251796.
  • फॅक्स: + 91 477 2251720
  • ईमेल: alp_dtpcalpy@sancharnet.in


 
 
 
Photos
Photos
information
Souvenirs
 
     
Department of Tourism, Government of Kerala,
Park View, Thiruvananthapuram, Kerala, India - 695 033
Phone: +91-471-2321132 Fax: +91-471-2322279.

Tourist Information toll free No:1-800-425-4747
Tourist Alert Service No:9846300100
Email: info@keralatourism.org

All rights reserved © Kerala Tourism 1998. Copyright Terms of Use
Designed by Stark Communications, Hari & Das Design.
Developed & Maintained by Invis Multimedia