ज्यांना हॅरॉल्ड रॉबिन्सच्या तुलनेत थोरो जास्त आवडतो, म्हणजेच ज्यांना साहसापेक्षा शांतता जास्त आवडते त्यांच्यासाठी हा निर्जन आणि अप्रसिद्ध कप्पिल बीच सर्वोत्तम आहे. 6 किमी दूर असलेल्या बेकल किल्ल्याच्या दगदगीच्या सफरीनंतर हे विसाव्याचे उत्तम ठिकाण आहे.
साहसप्रेमींना जवळच्या कोडी क्लिफवर चढून अरबी सागराचे मनोहर दृश्य पाहता येईल.
येथे पोहोचण्यासाठी:
- जवळचे रेल्वे स्थानक: कासरगोड, साधारण 12 किमी
- जवळचा विमानतळ: मेंगलोर, कासरगोड शहर, करिपूरपासून 50 किमी वर, करिपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ, कोझिकोड, कासरगोड शहरापासून अंदाजे 200 किमी.