स्थान: थोडुपुझापासून सुमारे 40 कि.मी. इडुक्की जिल्हा, मध्य केरळ
इडुक्की हा भू-मध्य जिल्हा, केरळमधील सर्वाधिक निसर्ग-संपन्न क्षेत्रांपैकी एक क्षेत्र आहे. इडुक्की अभयारण्य हे जिल्ह्यातील थोडुपुझा व उदंपंचोला तालुक्यांमधील 77 चौ.कि.मी. क्षेत्रावर पसरले असून, ते समुद्रसपाटीपासून 450-748 मी. उंचीवर वसले आहे. या अभयारण्याने चेरुथोनी आणि पेरियार नद्यांमधील जंगलाचा प्रदेश व्यापला आहे. या अभयारण्यात एक सुरेख तलाव असून तो चारी बाजूंनी उष्णकटिबंधातील सदाहरीत व पानझडी वृक्षराजीने वेढलेला आहे. या तलावात नौकाविहाराची ही सोय आहे.
येथे कोब्रा, वायपर, क्रेट तसेच अनेक बिन-विषारी जातींच्या सापांसह, हत्ती, रानगवे, जंगली कुत्रे, जंगली मांजरी, वाघ, जंगली डुक्कर इ. प्राणी आढळून येतात. करड्या रंगाच्या जंगली कोंबड्या, करड्या रंगाचे मलबारी हॉर्नबिल्स, सुतारपक्ष्यांच्या अनेक जाती, बुलबुल, फ्लायकॅचर्स इ. अनेक प्रकारचे पक्षी देखील आढळून येतात. इथले वन्यजीवन तेक्कडितील वन्यजीवनाशी मिळते-जुळते आहे. हे अभयारण्य जगप्रसिद्ध इडुक्की कमानी धरणाच्या अगदी जवळ आहे.
येथे पोहोचण्यासाठी: थोडुपुझा-कोची सुमारे 58 कि.मी.
- जवळचे रेल्वे-स्टेशन: कोट्टायम 114 किमी चंगनसेरी 114 किमी
- जवळचा विमानतळ: शेजारील कर्नाटकातील मदुराई, सुमारे 140 कि.मी. व कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ सुमारे 190 किमी