स्थान: मध्य केरळमधील इडुक्की जिल्ह्यातील कुमलीपासून साधारणतः 40 किमी दूर
पीरमेडू हे समुद्रसपाटीपासून 915 मीटर उंचावर असणारे अतिशय सुंदर असे पर्वतीय प्रदेशाचे ठिकाण आहे. हे पश्चिमी घाटातील एक उपयुक्त आश्रयस्थान आहे तसेच पेरियार टायगर रिझर्व या नावाने ओळखल्या जाणार्याि पर्यटकांसाठी हे एक विश्रामस्थान देखील आहे.
नैसर्गिक गवताळ प्रदेशाबरोबरच सभोवती असणारे चहा, कॉफ़ी, वेलची, रबर आणि निलगिरी यांचे विशाल मळे असल्याने हे ठिकाण एक उपयुक्त उन्हाळी रिसॉर्ट बनले आहे.त्रावणकोरच्या राजांचा हा उन्हाळी महाल आज एक महत्त्वपूर्ण ऎतिहासिक स्मारकाच्या रूपात उभा आहे.
पीरमेडू आणि त्याच्या सभोवतालचा प्रदेश हा ट्रेकिंग करणे, सायकल चालविणे, तसेच घोडेस्वारी करणे यासाठी एक उपयुक्त स्थान आहे. पीरमेडूपासून 3 किमी अंतरावर असलेले कुट्टिकानम हे साहसी पर्यटन आणि ट्रेकिंग यांसाठी एक उपयुक्त ठिकाण आहे.
येथील दुसरे आकर्षण म्हणजे त्रिशंकू पर्वतरांगा, ज्या साधारण 4 किमी दूर अंतरावर आहेत. दूरवर पसरलेल्या पर्वतरांगा, चित्ताकर्षक देखावे आणि हळुवार वाहणारा वारा यामुळे हा प्रदेश दूरवर पायी चालत जाण्यासाठी अनुकूल बनला आहे. पर्वतरांगांमधून सूर्योदय आणि सूर्यास्ताचे मनोरम दृश्य पाहावयास मिळते.
Department of Tourism, Government of Kerala, Park View, Thiruvananthapuram, Kerala, India - 695 033
Phone: +91-471-2321132 Fax: +91-471-2322279.
Tourist Information toll free No:1-800-425-4747
Tourist Alert Service No:9846300100
Email: info@keralatourism.org