स्थळ: कोचि शहरापासून साधारण 58 किमी आणि एर्नाकुलम जिल्ह्यातील कोठमंगलमच्या 13 किमी उत्तर-पूर्व दिशेला आहे; मध्य केरळातील, इडुक्की जिल्ह्यातील देविकुलम तालुक्यात तट्टेक्काड येथे स्थित आहे.
तट्टेक्काड उष्ण कटिबंधीय सदाहरीत आणि पानझडी जंगले आणि काही गवताळ प्रदेश यापासून बनला आहे. हे जगप्रसिद्ध पक्षी अभयारण्य ज्याला आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त पक्षीशास्त्रज्ञ डॉ.सलिम अली यांच्यामुळे प्रसिद्धी मिळाली आहे.1930 च्या दशकाच्या सुरुवातीला त्यांच्या त्रावणकोर येथील पक्षी सर्वेक्षणात त्यांना असे आढळले की हे स्थान पक्ष्यांच्या विविध जातींने अत्यंत समृद्ध आहे आणि ते पक्षी अभयारण्य म्हणून बनविण्यात यावे अशी त्यांनी शिफ़ारीश केली. अशाप्रकारे त्यांचे प्रयत्न ह्या अभयारण्याच्या स्थापनेत मोठ्या प्रमाणात कारक बनले. 300हून अधिक पक्ष्यांच्या जाति येथे आढळतात.
25 चौ.किमी परिसरात पसरलेले हे अभयारण्य पेरियार नदिच्या उपनद्यांमधे द्विपकल्पासारखे वसलेले आहे.श्रीलंकन फ़्रॉगमाऊथ, रॅकेट टेल्ड ड्रॉंगो, ब्रॉंझ ड्रॉंगो, व्हाइटबिलियड ट्रीपि, शामा, पिवली भिवईवाला बुलबुल, रुफ़स बाबलर, मालाबार शुकपक्षी, व्हाइटबिलियड ब्ल्यू फ़्लायकॅचर, मालाबार ग्रे हॉर्नबिल (राखी धनेश), यासारखे पक्षी सहजपणे पहायला मिळतात.
तट्टेक्काडमधे विस्तिर्ण सागाची, रोजवूड आणि महोगनीची लागवड आहे.हे घनदाट जंगल साधारण 28 जातिच्या सस्तन प्राणी आणि 9जातिच्या सरपटणार्या प्राण्यांचे घर आहे.
येथे पोहोचण्यासाठी:
- जवळचे रेल्वेस्टेशन: अलुवा, साधारण48 किमी दूर.
- जवळचा विमानतळ: कोचिन आंतरराष्ट्रीय विमानतळ,साधारण 44 किमी