Trade Media
     

मुथंगा- वन्यजीवनात रस असणाऱ्यांसाठीच


स्थान: सुलतान बाथरीच्या पूर्वेस सुमारे 16 कि.मी., वायनाड जिल्हा, उत्तर केरळ.

भेटीस योग्य कालावधी: जून ते ऑक्टोबर

आकर्षण: स्वच्छंदपणे फिरणारे हत्ती, हरणे इ.

जंगली हत्ती पहाण्याचे आदर्श ठिकाण मुथुंगा हे ठिकाण शेजारील कर्नाटक राज्याचे आरक्षित वन्य क्षेत्रांचे नेटवर्क नागरहोळ राष्ट्रीय उद्यान व बांदीपूर वाघ अभयारण्य तसेच तामिळनाडूमधील मुदुमलाई यांना जोडलेले आहे. सुमारे 345चौ.कि.मी क्षेत्रावर पसरलेले हे क्षेत्र वन्यजीवन व वनस्पतींनी समृद्ध असून ते ‘प्रोजेक्ट एलिफंट’ च्या अंतर्गत येते.

येथे हत्ती अतिशय मुक्तपणे संचार करताना दिसून येतात, तर कधी-कधी तुम्हाला वाघही दृष्टीस पडू शकतात. हरणे, माकडे, व पक्ष्यांचे अनेकविध जाती देखील येथे आढळून येतात. येथील वृक्ष व वनस्पती या परंपरागत दक्षिण भारतीय पानझडी व पश्चिम घाटावरील अर्ध-सदाहरीत प्रकारच्या आहेत. मुथुंगा व पुढचा प्रवास रस्त्यावरून केल्यास तुम्ही येथील फिरणारे प्राणी प्राणी बघू शकता. वनखात्यातर्फे ‘हत्तीवरील सवाऱ्या देखील आयोजित केल्या जातात.

येथे पोहोचण्यासाठी:
  • जवळचे रेल्वेस्थानक: कोझिकोडे, सुलतान बाथरीपासून सुमारे 97कि.मी. अंतराचा रस्ता
  • जवळचा विमानतळ: कारीपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ, कोझिकोडे, सुलतान बाथरीपासून सुमारे 120 कि.मी.


 
 
 
Photos
Photos
information
Souvenirs
 
     
Department of Tourism, Government of Kerala,
Park View, Thiruvananthapuram, Kerala, India - 695 033
Phone: +91-471-2321132 Fax: +91-471-2322279.

Tourist Information toll free No:1-800-425-4747
Tourist Alert Service No:9846300100
Email: info@keralatourism.org

All rights reserved © Kerala Tourism 1998. Copyright Terms of Use
Designed by Stark Communications, Hari & Das Design.
Developed & Maintained by Invis Multimedia