स्थान: दक्षिण केरळमधील, थिरुवनंतपुरम शहरापासून साधारणतः 61 किलोमीटर.
उंची : समुद्रसपाटीपासून 915 मीटर ऊंच.
थिरुवनंतपुरमपासून काही किमी ड्राईव्हच्या अंतरावरच पोन्मुडि हे मनोरम असे हिल रिसॉर्ट आहे जेथे तुम्ही निमुळते चक्राकार रस्ते,शीतल आणि हिरव्यागार अशा वातावरणाचा आनंद लुटू शकता. विविध प्रकारांनी सजलेली पहाडी फुले, रंगीबेरंगी फुलपाखरे, छोट्या छोट्या नद्या यांनी सजलेले पोन्मुडि आपल्याला ट्रेकिंगसाठी देखील एक उत्तम स्थान बहाल करते. चहाचे मळे आणि धुक्यांनी भरलेल्या घाटींमुळे पोन्मुडि हे कॉटेज आणि डॉर्मिटरी अकोमडेशन (धर्मशाळा निवास) या सुविधांनी युक्त असे आणि जोमाने विकसित होणारे हिल रिसॉर्ट आहे.
येथे पोहोचण्यासाठी:
- जवळचे रेल्वे स्थानक: थिरुवनंतपुरम सेन्ट्रल, साधारण 61 किमी
- जवळचा विमानतळ: थिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळ, साधारण 67 किमी.