बेपोर कोझिकोड शहराच्या दक्षिणेकडे 10 किमीवर चलियार नदीच्या मुखाशी आहे..हे स्थान ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे आहे कारण हे पूर्वीच्या अरबी आणि चिनी व्यापाऱ्यांच्या व नंतर युरोपियन व्यापाऱ्यांच्या काळात महत्त्वाचे बंदर, मासेमारी बंदर होते तसेच मनोरंजनाचे केंद्र होते. लवकरच बंदर आणि व्यापारी केंद्र म्हणून विकसित झाल्यावर, बेपोर जहाजबांधणीचे केंद्र म्हणून विकसित होऊ लागले. कारण पश्चिम आशियातील व्यापाऱ्यांकडून जहाजांना पुष्कळ मागणी होती. ही जहाजबांधणीची परंपरा जवळजवळ 1500 वर्षे जुनी आहे आणि येथील कारागिरांचे कौशल्य विशेष आहे.
पूर्वीपासून जहाज खरेदीत अरबांचा मोठा वाटा असे. ते त्यांच्या गरजांनुसार मागणी करत. आधुनिक काळात ब्लूप्रिंट आणि मशीनरीने निर्माण होणाऱ्या जहाजांच्या विरुद्ध, येथे बेपोरमध्ये प्रत्येक गोष्ट कारागिरांच्या डोक्यात तयार होत असे आणि समूहाने मिळून ते अचूक काम करत असत. उत्पादन प्रक्रियेत आधुनिकता कमी असूनही उरू कसे निर्माण होतात हे पाहणे मनोरंजक असते. संपूर्ण कारागिरांचा गट विशिष्ट नियम पाळते व त्याची शिस्त अतिशय महत्त्वाची असते. या ऐतिहासिक ठिकाणाला भेट देऊन त्यांचे चौकस मेंदू, कौशल्य, मापन आणि जहाजाचे वेगवेगळे भाग एकत्र करणे हे पाहता येईल.
जवळचे आकर्षणाचे ठिकाण आहे, बेपोर ज्यात मासेमारी बंदर आहे, ते जहाजबांधणी कारखान्यापासून अगदी एक किलोमीटरवर आहे आणि कडलुंडी पक्षी अभयारण्य, जे बेपोरपासून 7 किमी आहे. कडलुंडी नदीमुख हे पक्षीनिरीक्षणासाठी नंदनवन मानले जाते कारण येथे स्थानिक व स्थलांतरित पक्ष्यांची विविधता आहे. स्थलांतरित पक्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये येथे मोठ्या संख्येने येतात.
हे अभयारण्य टेकड्यांनी वेढलेल्या बेटांच्या समूहावर असून येथे कडलुंडी नदी अरबी समुद्रास मिळते. या जागेचे स्थानिक नाव आहे, कडलुंडी नगरम
येथे पोहोचण्यासाठी:
- जवळचे रेल्वे स्थानक: कोझिकोड शहरापासून साधारण 10 किमी
- जवळचा विमानतळ: करिपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ, कोझिकोड शहरापासून साधारण 23 किमी.