स्थान: कडलुंडी पक्षी अभयारण्य, कोझिकोडे येथून सुमारे 19 कि.मी. व अरबी समुद्रातील बेपोर पोर्ट या ठिकाणाहून सुमारे 7 कि.मी.वर, मलप्पुरम जिल्हा, उत्तर केरळ.
अतिशय सुरेख अशा पर्वतराजीने वेढलेल्या एका बेटांच्या समूहावर कडलुंडी पक्षी अभयारण्य वसले आहे. इथूनच कडलुंडी नदी वाहत अरबी समुद्रास जाऊन मिळते. स्थानिक लोक या नगरास कडलुंडी नगरम म्हणूनच ओळखतात.
बाह्य जगापासून लांब असणारी ही जागा 100 हून अधिक स्थानिक पक्ष्यांच्या जाती व सी-गल, टर्न, सॅण्डपायपर, सॅण्डप्लोव्हर, लाल आणि हिरवे शॅंक्स, टर्नस्टोन्स इ.60 हून अधिक स्थलांतरित पक्ष्यांच्या जातींचे वसतिस्थान आहे. ऑक्टोबर ते मार्च च्या दरम्यान या पक्ष्यांचे थवेच्या थवे येथे स्थलांतरित होतात.
जवळच असणाऱ्या एका 200 मी. उंचीच्या डोंगरावरून नदीमुख आणि समुद्र यांचा अतिशय सुंदर देखावा पहाता येतो. कडलुंडी नदीमधे अनेक प्रकारचे मासे, शिंपले, व खेकडे सापडतात.
येथे पोहोचण्यासाठी:
- जवळचे रेल्वेस्थानक: कोझिकोडे, कडलुंडीहून सुमारे 19 कि.मी.
- जवळचा विमानतळ: करीपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ, कोझिकोडे शहरापासून सुमारे 23कि.मी.