आपण यापूर्वी केव्हा खरोखर वन्यजीवनाचा अनुभव घेतला हे आठवून पहा. ह्या महिन्यात आम्ही तुम्हाला उष्णकटिबंधीय अर्ध-सदाहरीत जंगलाचा आनंद अनुभविण्यास निमंत्रण देत आहोत. कदाचित काही पार्टी प्राणी-हत्ती, वाघ, चित्ते, रानगवा, सांबर, रानडुक्कर, लायन टेल (सिंहाची शेपटी असलेले) माकडे, निलगिरी माकडे, हरिण आणि पश्चिम तटावरील उष्णकटिबंधीय सदाहरित जंगलातील इतर अनेक रहिवासी तुम्हाला सोबत म्हणून, लाभतील.
शेंडुरुनी जंगल-जे 1984 मधे वन्यजीवन अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले आहे त्याचे नाव देशज झाडाची जाति जीचे नाव चेन्कुरिंजी (ग्लूटा त्रावणकोरिका) यावरुन ठेवण्यात आले आहे. या दमट, पानझडी मिश्रित जंगल जे साधारण 100 चौ.किमी च्या डोंगराळ भूप्रदेशात पसरले आहे त्याच्या मध्य भागात, शेंडुरुनी आणि कुलथुपुझा नदीवर बांधलेल्या परप्परा धरणामुळे तयार झालेला 26 चौ.किमी कृत्रिम तलाव आहे.
शेंदुरुनीचा सुंदर परिसर थकलेल्या मनाला उल्हासीत करतो आणि त्यासाठीच ते प्रसिद्ध आहे. नुकत्याच काही पुरातत्व शोधांनुसार, एक पूर्व-ऎतिहासिक दगडी कोरीव काम असलेला खडकाळ भाग सापडला आहे जो मध्यपाषाण काळातील (5210 – 4420BC) असावा असा विश्वास आहे.
येथे पोहोचण्यासाठी:
रस्त्याने: कोल्लम शहरापासून 66 किमी, कोल्लम जिल्ह्याच्या पतनपुरम तालुक मधील कोल्लम-शेनकोट्टा रोडवर.
- जवळ्चे रेल्वेस्टेशन: थेन्मला जे चेन्नई,दिल्ली,मुंबई आणि काश्मिर से जोडण्यात आले आहे.
- जवळचा विमानतळ: थिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळ, साधारण 72 किमी दूर.
अधिक माहितीसाठी:
संपर्क:चिफ़ कंजरवेटर ऑफ़ फ़ॉरेस्ट(वाइल्डलाइफ़)
थिरुवनंतपुरम 695014
टेलीफ़ॅक्स: + 91 471 322217.
किंवा
द वाइल्डलाइफ़ वॉर्डन
शेंडुरुनी वाइल्ड लाइफ़ सॅंक्ट्युअरी
थन्मला डॅम पी.ओ.
जिल्हा कोल्लम
फ़ोन: + 91 475 344600.