स्थळ: एलमकवु भगवती मंदिर, वडयार, वाइकोमपासून 3 किमी.
आट्टुवेला महोत्सवम हा जल आनंदोत्सव आहे. दंतकथेनुसार देवी एलमकवु या आपल्या बहिणीला भेटण्यासाठी आलेल्या कोडुंगल्लूर देवीचा हा स्वागत समारंभ आहे. या छोट्याशा देवळात देवी भगवती ही देवता विराजमान झालेली आहे. दोन दिवसाच्या आट्टुवेलामध्ये देवळाची हुबेहुब प्रतिकृती दर्शविणारे अतिशय सुंदरपणे सजवलेले पडाव, अनेकविध रंगांनी सजविलेल्या -छोट्या पडावातून जलप्रवास आणि देवळात वाजविले जाणारे वाद्य असते. पडावातील ही मिरवणूक देवळापासून 2 किमी दूर असलेल्या आट्टुवेला काडावूपासून सुरु होते.
जाण्याचा मार्ग:
- जवळचे रेल्वे स्थानक: अंदाजे 30 किमी दूर असलेले एर्नाकुलम
- जवळचे विमानतळ: अंदाजे 50 किमी दूर असलेले कोचिन आंतरराष्ट्रीय विमानतळ.