स्थळ: सेंट जॉर्ज चर्च, इडतुआ, अलप्पुझा जिल्हा.
1810 मध्ये स्थापन झालेले इडतुआ चर्च हे पम्बा नदीच्या किनारी वसलेले एक मोठे तीर्थस्थान आहे आणि हे सेंट जॉर्ज यांच्या सन्मानार्थ आहे. पेरुन्नल किंवा मेजवानीदरम्यान, सोन्याने मढवलेल्या सेंट जॉर्जच्या पुतळ्याची मिरवणूक काढली जाते आणि बेसिलिकाच्या मध्यभागी चबुतऱ्यावर प्रस्थापित केला जातो. रोज मिरवणूक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होतात ज्यात पहिल्या आणि शेवटच्या दिवशी रोषणाईसुद्धा केली जाते. सर्व राज्यातील भक्त या उत्सवात सहभागी होतात.
येथे पोहोचण्यासाठी:
- जवळचे रेलवे स्थानक: अलप्पुझा, 24 किमी दूर.
- जवळचा विमानतळ: कोचिन आंतरराष्ट्रीय विमानतळ, अलप्पुझापासून 85 किमी दूर.