स्थळ: तिरुनक्कर महादेव मंदिर, जिल्हा कोट्टयम.
तिरुनक्कर येथील 10 दिवसांचा उत्सव हा अरट्टू उत्सवासारखाच आहे. अरट्टू मिरवणुकीत नेहमी सजवलेले 9 हत्ती सहभागी होतात आणि ही मिरवणूक दुपारी सुरू होते. मयिलत्तोम (मयूर नृत्य), वेलकली सारख्या लोककला मंदिर परिसरात संध्याकाळी सादर होतात. मुख्य आकर्षण असते उत्सवाच्या तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी रात्रभर चालणारे कथकली नृत्य.
येथे पोहोचण्यासाठी:
- जवळचे रेल्वे स्थानक: कोट्टयम, मंदिरापासून काही मिनिटांच्या अंतरावर
- जवळचे विमानतळ: कोचिन आंतरराष्ट्रीय विमानतळ, कोट्टयम पासून साधारण 76 किलोमीटर दूर.