स्थळ: कांजिरमट्टम् मशिद, एर्नाकुलम जिल्हा.
कांजिरमट्टम् मशिद ही शेख फरिदुद्दीनच्या स्मृतीप्रीत्यर्थ बांधली गेली. कोडिकुत्तूचा हा उत्सव दरवर्षी 13 ते 14 जानेवारीला साजरा होतो. यातील रात्री होणाऱ्या चंदनक्कुडम विधीत यात्री चंदनलेप लावलेले घडे डोक्यावर घेवून मशिदीपर्यंत मिरवणूक काढतात. मिरवणुकीसोबत सजवलेले हत्ती आणि लोकनृत्यांचे प्रदर्शन असते. या उत्सवात पारंपरिक इस्लामी कला जसे डफमुट्टू आणि कोलकली सादर होतात.
येथे पोहोचण्यासाठी:
- जवळचे रेलवे स्थानक: एर्नाकुलम, साधारण 25 किमी दूर.
- जवळचा विमानतळ: कोचिन आंतरराष्ट्रीय विमानतळ, साधारण 45 किमी दूर.