स्थळ: पुन्नमड बॅकवॉटर्स, जिल्हा अलप्पुझा
नेहरू ट्रॉफी नौका स्पर्धा केरळच्या बॅकवॉटर्सचा सर्वात मोठा उत्सव आहे. ह्या स्पर्धाचे आयोजन प्रतिवर्षी ऑगस्ट महिन्याच्या दुसर्या शनिवारी केले जाते. भारताचे पहिले पंतप्रधान श्री जवाहरलाल नेहरू ह्यांनी प्रचलित केलेल्या ट्रॉफीसाठी भव्य सर्पनौका प्रतिस्पर्धा करतात. चन्दनवल्लम (स्नेकबोट) आणि छोट्या देशी नौकांची स्पर्धा ह्याव्यतिरीक्त या समारोहात धार्मिक जल मिरवणूक, शानदार फ्लोट्स (शोभायान) आणि सुसज्जित नौकांची मनमोहक दृश्ये पहायला मिळतात.
येथे जाण्यासाठी:
- जवळचे रेल्वेस्थानक: अलप्पुझा, साधारण 8 किमी दूर.
- जवळचा विमानतळ: कोचिन आंतरराष्ट्रीय विमानतळ, अलप्पुझापासून साधारण 85 किमी.