स्थळ: मचट्टु तिरुवनिकवु मंदिरम वडक्कनचेरी, त्रिशुर जिल्हा.
देवी भगवतीला समर्पित असलेल्या ह्या मंदिरात प्रसिद्ध मचट्टुवेल उत्सव मोठ्या थाटामाटात, दिमाखात आणि भव्य स्वरुपात पाच दिवस साजरा केला जातो. मुख्य विधी शेवटच्या दिवशी असतो. भव्य स्वरूपात सजविलेले कुटिरकोलम (घोड्यांच्या आकृत्या) भक्तांद्वारे भेट म्हणून समारंभपूर्वक मंदिरात आणले जातात. संध्याकाळी मंदिराच्या प्रांगणात चेन्दमेलम (पारंपरिक वाद्य संगीत)सोबत हत्तींची स्पर्धा आयोजित केली जाते, जे एक दिमाखदार प्रेक्षणीय असे चित्र असते. सणांच्या दिवसांमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात.
जाण्याचा मार्ग:
- जवळचे रेल्वे स्थानक: अंदाजे 21 किमी दूर असलेले त्रिशुर.
- जवळचे विमानतळ: त्रिशुरपासून अंदाजे 58 किमी दूर असलेले कोचिन आंतराष्ट्रीय विमानतळ.