स्थळ: पार्थसारथी देऊळ,अडूर, (अडूरमधील केएसआरटीसी बस स्थानकाजवळ) जिल्हा: पत्तनमतिट्टा.
शेवटच्या दिवशी होणारा गजमेला किंवा हत्तींची स्पर्धा ही श्री पार्थसारथी देवळात १० दिवस होणार्या वार्षिक उत्सवाची झलक असते. इथे पार्थसारथी या नावाने उल्लेख केलेल्या, भगवान श्री कृष्णाला हे देऊळ समर्पित केलेले आहे. (पार्थाचा सारथी; पार्थ (अर्जुन) हा महाभारत या महाकाव्यातील पाच नायक असलेल्या पांडवांमधील एक राजकुमार होता. राजेशाही थाटात दागिन्यांनी सजविलेले नऊ हत्ती या नेत्रदीपक मिरवणुकीत सहभागी होतात.
जाण्याचा मार्ग:
- जवळचे रेल्वे स्थानक : अंदाजे 25 किमी दूर असलेले चेंगानूर
- जवळचे विमानतळ : अंदाजे ९२ किमी दूर असलेले थिरुवनंतपुरम् हे आंतरराष्ट्रीय विमानतळ.