सुंदर नौका स्पर्धा, अरन्मुला वल्लमकली (सर्प नौका स्पर्धा) एक धार्मिक नौका स्पर्धा आहे जी पहाणार्यांना चमत्काराने आकर्षित करते. ह्याचे आयोजन ओणमच्या मौसमात केले जाते. भव्य सर्प नौका पम्बा नदीच्या शांत पाण्यात वेगाने ग्लाइडिंग करते जे नजर खिळवून ठेवणारे दृश्य असते.
हा समारोह अरन्मुलाच्या पार्थसारथी मन्दिराशी खूप निगडीत आहे आणि त्याचे धार्मिक मूळ आहे. प्राचीन काळी सर्प नौका शोभायात्रेमधे तिरुवोनसद्या (शानदार ओणम मेजवानी), ज्याला अरन्मुलाच्या श्री पार्थसारथी मन्दिरात धार्मिक नैवेद्य करण्यासाठी बनविण्यात येते, त्यासाठी आवश्यक भाज्या, धान्य आणि अन्य खाद्य सामग्री आणली जाते. हा प्रसिद्ध अरन्मुला वल्लमकली वर्षानुवर्षापासून चालत आलेला धार्मिक रिवाज आहे.
येथे जाण्यासाठी:
- जवळचे रेल्वेस्थानक: चेंगन्नूर, साधारण 10 किमी दूर
- जवळचा विमानतळ: तिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळ, साधारण 117 किमी दूर.