स्थळ: श्री विश्वनाथ स्वामी मंदिर, कल्प्पात्ति, जिल्हा पलक्कड.
श्री विश्वनाथ स्वामी मंदिर येथील वार्षिक रथोत्सवम वा रथ उत्सव हा भगवान विश्वनाथ वा शिवाला समर्पित असतो,जो केरळच्या सर्व सणांत अपूर्व मानला जातो. कल्प्पात्ति, एक प्राचीन तामिळ ब्राह्मण वसाहत आहे ज्याला ‘दक्षिण काशी’ अथवा ‘दक्षिणेचे वाराणसी’ या नावाने सुद्धा ओळखले जाते.पहिल्या चार दिवसात, मन्दिरात वैदिक पाठ आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. हे मन्दिर 700 वर्ष जुने आहे असे मानले जाते. अंतिम तीन दिवसांत, हजारोंच्या संख्येने भक्त जमा होतात आणि मन्दिराच्या रथाला सुसज्जित करुन रस्त्यावर ओढून नेतात. ह्या धार्मिक मिरवणुकीत किर्तन करीत जाणारा जनसागर नेत्रदिपक असतो.
येथे जाण्यासाठी:
- जवळचे रेल्वेस्थानक: पालक्कड,साधारण 3 किमी दूर.
- जवळचा विमानतळ: शेजारी राज्य तामिळनाडूमधील कोईम्बतूर, पालक्कड पासून साधारण 55 किमी दूर.