स्थळ: पयिप्पड नदी, पयिप्पड, अलप्पुझा
ह्या नौका स्पर्धांमधे सर्वात महत्वपूर्ण आहे गटातील सदस्यांचा उत्साह. पयिप्पड नदीवर प्रत्येक वर्षी एकदा आयोजित होणारी ही नौका स्पर्धा खरोखरच लोकांना खूप आकर्षित करते. इथे वेग महत्वाचा आहे आणि म्हणून संपूर्ण स्पर्धामध्ये पर्यटक जोरजोरात ओरडून नौका चालविणार्यांना प्रोत्साहीत करतात.
सर्प नौका स्पर्धा, जलयानद्वारा असाधारण जल स्पर्धा, सुसज्जित नौका आणि अनेक लोककलांचे प्रदर्शन ह्या समारोहाचे मुख्य आकर्षण आहे.
येथे जाण्यासाठी:
- जवळचे रेल्वे स्थानक: हरिप्पाड, साधारण 5 किमी दूर.
- जवळचा विमानतळ: कोचिन आंतरराष्ट्रीय विमानतळ, अलप्पुझापासून साधारण 85 किमी.