स्थळ: परियनमपेट्ट भगवती मन्दिर, कट्टुकुलम, जिल्हा पलक्कड.
सात दिवस चालणारा हा वार्षिकोत्सव परियनमपेट्ट मन्दिरात आयोजित केला जातो जो भगवती अथवा देवीला समर्पित केला जातो. पूरम, उत्सवाचा अंतिम दिवस, 21 हत्तींच्या धार्मिक मिरवणूक द्वारा साजरा केला जातो.
उत्सवाच्या सर्व दिवशी कलमेझुतु पुट्टु (गाण्यांसहित फ़रशीवर देव्यांचे चित्र काढण्याची प्रथा)चे आयोजन केले जाते. समाप्तिच्या दिवशी शोभायात्रेच्या सोबत धार्मिक लोककला जसे की कालवेल (बैलांच्या आकृतिचे प्रदर्शन) आणि कुतुरवेल (घोड्यांच्या आकृतिचे प्रदर्शन), पूतनुम तिरयुम इत्यादिंचे सुद्धा आयोजन करण्यात येते.
उत्सवाच्या दरम्यान चालणार्या सांस्कृतिक मेळ्यात कथकली आणि चक्यर्कूतु समाविष्त असतात. छाया कठपुतलीची प्राचीन लोककला जिला थोल्पवकूतु म्हणतात, त्याचे आयोजन उत्सवाच्या प्रत्येक रात्री केले जाते.
येथे जाण्यासाठी:
- जवळचे रेल्वेस्थानक: पलक्कड,साधारण 45 किमी दूर
- जवळचा विमानतळ: शेजारील राज्य तामिळनाडुतील कोईम्बतूर, पलक्कड पासून साधारण 55 किमी दूर.