स्थळ: श्री चिनक्कतूर भगवती मंदिर,पलप्पुरम,जिल्हा पलक्कड
श्री चिनक्कतूर भगवती मन्दिरात आयोजित ह्या दिवसभर चालणार्या पूरमचे आकर्षण आहे आकर्षित ढंगात सुसज्जित 33 हत्तींची संध्याकाळी निघणारी एक भव्य मिरवणूक.
हत्तींच्या या सौंदर्य स्पर्धेत पारंपरिक वाद्ययंत्र वाजविले जातात. साधारणत: 16 सुसज्जित कुतिर (घोड्याची आकृति) आणि 8 काल (बैलाची आकृति) यांना मन्दिराच्या मिरवणुकीत भक्तांकरवी आणले जाते. वेल्लट्टु, पूतनुम तिरयुम, आंडी वेदन, करिवेल, कुम्भमकली (मडक्यांबरोबर नृत्य) इत्यादि कला रूप प्रस्तुत केल्या जातात. थोल्पवकूत्तु (छाया कठपुतली) चे आयोजन पूरमच्या आधीच्या 17 संध्याकाळी केले जाते.
येथे जाण्यासाठी:
- जवळचे रेल्वेस्थानक: ओट्ट्प्पलम, श्राइनपासून साधारण 5 किमी
- जवळचा विमानतळ: शेजारील राज्य तामिळनाडुतील कोईम्बतूर, श्राइनपासून साधारण 85 किमी.