स्थळ: पट्टम्बि मशिद, पट्टम्बि शहर येथील मुख्य रस्ता, पलक्कड जिल्हा.
पट्टम्बि नेर्चा हा उत्सव मलाबारचे मुस्लिम संत अलूर वालिया पूकुंजिकोया थंगल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ संपन्न होतो. उत्सवाचा शेवट भव्य मिरवणुकीने होतो ज्यात 100 सजवलेले हत्ती, रंगीबेरंगी फ्लोट्स, पंचवाद्यम (पाच कर्णे आणि ढोल यांचा मेळ), तयम्बक (ढोलांचा मेळ) हे वाद्यवृंद आणि लोककलांचे प्रदर्शन यांचा अंतर्भाव होतो. मिरवणूक उत्तररात्री भरतप्पुझा नदीच्या किनारी संपते जेथे पंचवाद्यम चा नाद टिपेला पोहोचतो आणि लोककला सुंदर रूप धारण करतात.
येथे पोहोचण्यासाठी:
- जवळचे रेलवे स्थानक: पट्टम्बि रेलवे स्थानक, मशिदीपासून चालत जाण्याचा अंतरावर
- जवळचा विमानतळ: कोईम्बतूर, शेजारच्या तामिळनाडू राज्यात, पलक्कडपासून 55 किमी दूर.