स्थळ: सेंट मेरी चर्च, मनर्कडा, कोट्टयम जिल्हा.
मनर्कडाच्या सेंट मेरी चर्च मधील वार्षिक आठ दिवसांचा उत्सव वर्जिन मेरीसाठी असतो. उपवास आणि प्रार्थनेचे हे दिवस असतात. आठ दिवसांच्या या धार्मिक उत्सवाला एट्टू नोयम्बू म्हणतात. शेवटच्या तीन दिवसांत, भक्तांची रंगीबेरंगी मिरवणूक निघते ज्यात रंगीबेरंगी छत्रे आणि सोन्याचा क्रॉस नेला जातो.
येथे पोहोचण्यासाठी:
- जवळचे रेलवे स्थानक: कोट्टयम, 10 किमी दूर.
- जवळचा विमानतळ: कोचिन आंतरराष्ट्रीय विमानतळ, कोट्टयम पासून 76 किमी दूर.