अवियल मध्ये बहुतेक सर्व उपलब्ध स्थानिक भाज्या घातल्या जातात. म्हणूनच एखादा नवखा स्वयंपाकी असेल आणि त्याला भाज्यांची नावे आणि किंमती माहित नसतील आणि त्याला भाज्या घ्यायला जायचे असेल तर त्याने बिनधास्त अवियल कुट्टू (अवियल मिश्रण) सांगावे, समजा, 40 ते 50 रुपयांचे सांगावे आणि नक्कीच त्याला आठवड्याभराच्या भाज्या मिळून जातील. मात्र यात पालेभाजी नसते.
अवियलची तांत्रिक अशी काटेकोर पाककृती आहे मात्र दिलेल्या भाज्यांपेक्षा कमी जास्त भाज्या घातल्या तरी चालतील.
भाज्यांच्या मूळ संचात येतात:
- 1 गाजर
- 3 फरसबी शेंगा
- 2 कच्ची केळी
- 1 मध्यम आकाराचे वांगे
- 100 ग्रॅम काकडी
- 100 ग्रॅम पडवळ
- 100 ग्रॅम सुरण
एक शेकटाची शेंग
2 कप खोवलेला नारळ, एक चमचा जिरे आणि 6 हिरव्या मिरच्या एकत्र वाटून घ्या.
- 2 कप खोवलेला नारळ
- एक चमचा जिरे
- 6 हिरव्या मिरच्या
शिजवलेल्या मिश्रणाला शेवटचे रूप देताना, दही आणि खोबरेल तेल घालावे लागेल. त्यामुळे 2 चमचे दही आणि ¼ कप खोबरेल तेल तयार ठेवा.
- 2 चमचे दही
- ¼ कप खोबरेल तेल
याखेरीज, तुम्हाला लागेल मीठ, अर्धा चमचा हळद, कोथिंबिर
- मीठ
- अर्धा चमचा हळद
- कोथिंबीर
कृती
भाज्यांचे लांब तुकडे करून घ्या. त्यांना हळद घालून उकळवा आणि पुरेसे पाणी घाला. यात बारीक वाटलेला नारळ घाला. पाच मिनिटे शिजवा. मीठ घाला.
आचेवरून काढा आणि दही घालून मिसळा आणि खोबरेल तेल घाला. चांगले मिसळा. गरम-गरम वाढा.
श्रीमती लीला वेणु कुमार यांची पाककृती
दूरध्वनी क्रमांक: +919895534383
ईमेल: devoo_07@yahoo.co.in