हा व्हिडिओ दाखवेल की काई मेजुक्कुरपुरट्टी किंवा परतलेली केळी कशी बनवली जातात.
सामग्री
- कच्ची केळी - 3 (चौकोनी तुकडे केलेली)
- सुखे खोबरे - 1/2 कप
- हिरव्या मिरच्या - 6 (लांब कापलेल्या)
- लाल तिखट - 1 चमचा
- हळद - ½ चमचा
- मीठ - चवीपुरते
- तेल
- मोहरी - 1 चमचा
- कढीपत्ता
- उडीद डाळ - 1 चमचा
कृती
कढईत 3 चमचे तेल गरम करा. यात मोहरी, उडीद डाळ आणि नारळाचे तुकडे घाला. चांगले परता. आता कढीपत्ता घाला. थोडे परता आणि हिरव्या मिरच्या घालून काही वेळ परता. केळ्याचे पातळ चौकोनी तुकडे घाला आणि थोडे परता. नंतर मीठ, हळद आणि लाल तिखट घाला. आता एक कप पाणी घाला. थोडे ढवळा आणि भांड्यावर झाकण ठेवा. जेव्हा सगळे पानी शोषले जाईल तेव्हा, आच कमी करा आणि सगळे तुकडे छान एकत्र करा.
गरमागरम वाढा आणि आपल्या जेवणात काई मेजुक्कुरपुरट्टीच्या चवीचा आस्वाद घ्या.