हा व्हिडिओ पाईन-एपल मधुर पच्चडी कशी बनवायची ते सांगतो.
सामग्री
- अननसाचे काप - 1 कप
- चिंच - लिंबाएवढी
- गूळ - 1 लहान तुकडा
- नारळ (खोवलेला) - 1/2 कप
- लाल तिखट - ½ चमचा
- हिरव्या मिरच्या (चिरलेल्या) - 1 चमचा
- कढीपत्ता
- मोहरी - 1 चमचा
- लाल मिरची - 3
- तेल
- मीठ - चवीपुरते
कृती
भांड्यात अननसाचे तुकडे घाला. चिंच पाण्यात घालून उकळवा. लाल तिखट आणि मीठ घालून चांगले ढवला. आता थोडे पाणी घाला आणि भांडे झाकून दोन मिनिटे शिजवा.
झाकण काढा, चांगले ढवला. आता खोवलेला नारळ आणि हिरव्या मिरच्या यांचे वाटण शिजलेल्या अननसाच्या तुकड्यांवर घाला. गुळाचा तुकडा घाला आणि चांगले मिसळा.
आता फोडणी तयार करा. कढईत थोडे तेल घ्या. लाल मिरच्या मोहरी आणि कढीपत्ता घाला. फोडणी तयार झाल्यावर भांड्यातील पच्चडीवर घाला.
गरमागरम वाढा.