परतलेले बीफ बनविण्याच्या कृतीचा हा व्हिडिओ आहे.
एक किलोग्रॅम बीफ स्वच्छ करून, हाडे काढून, त्याचे छोटे तुकडे करून खालील मिश्रणात भिजवा:
- बारीक किसलेला नारळ - ½ कप
- दोन तुकडे केलेले कांदे - 1 कप
- धणे पूड – 3 चमचे
- लाल तिखट – 2 चमचे
- मिरी पूड – 2 चमचे
- हळद - ½ चमचा
- गरम मसाला - 2-3 चमचे
- तुकडॆ केलेलं ताजं आलं - 4-5 सेमी
- चिरलेल्या लसणीच्या पाकळ्या - 10.
- मीठ- चवीनुसार
बीफ चांगले भिजल्यावर, ते प्रेशर कुकरमध्ये 200 मिली पाण्यात मऊ होईपर्यंत शिजवा (अंदाजे 15-20 मिनिटे).
मांस तयार झाल्यावर त्यात पाणी शिल्लक राहिले असल्यास, पाणी पूर्ण निघून जाईपर्यंत कुकरचे झाकण काढून मोठ्या आचेवर शिजवा.
तीन ने चार चमचे खोबरेल तेलात दोन मध्यम आकाराच्या कांद्यांचे तुकडे आणि थोडी कढीपत्त्याची पाने परता. नंतर शिजवलेले बीफ त्यात घाला. मांस तपकिरी रंगाचे होईपर्यंत मध्यम आचेवर परता.
पाककृती: श्रीमती.लेलु रॉय (संदर्भ: लोनली प्लॅनेट एन्ड रफ गाईड)
ईमेल: simonroy@hotmail.com
दूरध्वनी: +91 471 2215377